कोण आहेत IPS संपत मीना ?, हाथरस, उन्नावसारखी प्रकरणे हाताळली, आता कोलकाता केसचा तपास करणार

| Updated on: Aug 24, 2024 | 7:48 PM

कोलकाता प्रकरण हे एखाद्या जनावराचे कृत्य असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली असून नॅशनल टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश सरकाराना दिले आहेत.

कोण आहेत IPS संपत मीना ?, हाथरस, उन्नावसारखी प्रकरणे हाताळली, आता कोलकाता केसचा तपास करणार
sampath meena, ips
Follow us on

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराने देश सुन्न झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता दोन वरिष्ठ महिला अधिकारी करणार आहेत. सीबीआयचे अतिरिक्त संचालक संपत मीना यांनी साल 2020 च्या उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या आणि साल 2017 च्या उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. केंद्रिय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कारातून झालेल्या निघृण हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दोन महिला आयपीएस महिला अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. सीबीआयचे अतिरिक्त संचालक संपत मीना यांना कोलकाता प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रमुख केले आहे.हाथरस प्रकरणात अतिरिक्त पोलिस अधिक्षक सीमा पाहुजा यांचा देखील पथकात समावेश केलेला आहे. कोण आहेत या आयपीएस संपत मीना पाहूयात…

झारखंडच्या 1994 बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या संपत मीना यांना कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 31 वर्षीय प्रशिक्षार्थी महिला डॉक्टरची बलात्कारातून हत्या केल्याच्या प्रकरणात तपास पथकाचे प्रमुख म्हणून सीबीआयने नियुक्त केले आहे. सीबीआयच्या 25 जणांच्या पथकाच्या त्या प्रमुख असणार आहेत. कोलकाता महिला डॉक्टरच्या निघृण हत्येने संपूर्ण देश सुन्न झाला आहे.देशभरातील डॉक्टर आणि निम वैद्यकीय अधिकारी या प्रकरणी निषेध आंदोलन करीत आहेत.

या प्रकरणात ग्राऊंड लेव्हलचा तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक सीमा पाहुजा करणार आहेत. पाहुजा यांना साल 2007 ते 2018 दरम्यान उत्कृष्ट तपासासाठी दोन वेळा स्वर्णपदक मिळाले आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणार होत्या. परंतू त्यावेळचे तत्कालिन सीबीआय संचालकांनी पाहुजा यांना त्यांना परावृत्त केले.

हिमाचलचे प्रकरण

काही वर्षापूर्वी हिमाचल प्रदेशात दहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा सिद्ध करण्यात पाहुजा यांनी केलेला तपासाची मदत होऊन आरोपीला शिक्षा देखील झाली होती. हे प्रकरण खुपच गुंतागुंतीचे होते. या प्रकरणाने साल 2017 मध्ये संपूर्ण हिमाचल प्रदेशात असंतोष निर्माण झाला होता. एका 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी 4 जुलै, 2017 रोजी आपल्या शाळेतून घरी येत असताना सिमलातील कोटखाई जंगलात तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या झाली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला होता. या प्रकरणात एका लाकूड तोड्याला दोषी ठरवित साल 2021 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 हाथरस आणि उन्नाव बलात्कार प्रकरणे

हाथरस येथे एका 19 वर्षीय दलित तरुणीवर चार सर्वण जातीच्या तरुणांनी सामुहिक बलात्कार केला होता. या तरुणीचा दोन आठवड्यानंतर नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशातील या प्रकरणावरुन भाजपा सरकारवर खूप टिका करण्यात आली. या मुलीच्या मृतदेहावर पालकाच्या संमतीविनाच पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याने हे प्रकरण वादग्रस्त ठरले होते. साल 2017 चे उन्नाव बलात्कार प्रकरण देखील धक्कादायक होते. या भाजपातून बडतर्फ झालेल्या कुलदीप सिंह सेंगर यांनी एका मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता.