PM नरेंद्र मोदींनी आवर्जुन जिच्या घरात चहा घेतला ती अयोध्येची मीरा आहे तरी कोण?

| Updated on: Dec 30, 2023 | 10:46 PM

मोदी यांनी निषाद राज यांच्या वंशजांची भेट घेतली. अयोध्या धाम जंक्शनला लागून असलेल्या मंगेशकर चौक (वीणा चौक) येथे असलेल्या वस्तीत निषाद राज यांचे वंशज राहतात. येथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेच्या घरी चहा घेतला.

PM नरेंद्र मोदींनी आवर्जुन जिच्या घरात चहा घेतला ती अयोध्येची मीरा आहे तरी कोण?
PM Narendra Modi
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

अयोध्या | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्येला पोहोचले. त्यांचे विमान येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळावर उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मोदी यांनी निषाद राज यांच्या वंशजांची भेट घेतली. अयोध्या धाम जंक्शनला लागून असलेल्या मंगेशकर चौक (वीणा चौक) येथे असलेल्या वस्तीत निषाद राज यांचे वंशज राहतात. येथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेच्या घरी चहा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या महिलेच्या घरी चहा घेतला तिचे नाव मीरा असे आहे. मीरा या उज्ज्वला योजनेच्या 10 कोटी व्या लाभार्थी आहेत. फुलविक्रेते म्हणून ती काम करते. तिच्या घरी पोहोचल्यानंतर पीएम मोदी यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि तिच्या हातचा चहाही घेतला. मीराच्या घराबाहेरच पीएम मोदी यांनी निषाद राज यांच्या कुटुंबातील काही मुलांची भेट घेतली. त्यांच्यासोबत काही वेळ चर्चा करून मोदी यांनी त्यांना राम ललाच्या अभिषेक समारंभाला आमंत्रित केले.

मीरा यांच्या कुटुंबियाची विचारपूस

पंतप्रधानांनी मीराला विचारले की ती काय काम करते? यावर तिने उत्तर दिले की ती फुले विकते. मंदिराच्या बांधकामामुळे आता त्यांचा फुलांचा व्यवसाय चांगला होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मीरा यांना उज्वला योजनेच्या फायद्यांबाबत विचारणा केली. यावर मीराने हिने मोफत गॅस आणि राहण्याची सोय मिळाली. पूर्वी त्यांचे कच्चे घर होते असे उत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांनी मीरा यांच्या कुटुंबियाची विचारपूस केली. त्यांनी निषाद राज यांच्या वंशातील मुलांना ऑटोग्राफ दिला. यामध्ये त्यांनी वंदे मातरम लिहिले.

‘कधी स्वप्नातही पाहिले नव्हते’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी भेट दिल्यानंतर मीरा यांनी ‘देव माझ्या घरी आला आहे. स्वप्नातही वाटले नव्हते. मोदी माझ्या घरी येत असल्याचे मला अर्ध्या तासापूर्वी समजले. यापूर्वी तिला सांगण्यात आले की कोणी तरी नेता जेवायला येत आहे. त्यामुळे घरी डाळ आणि तांदूळ बनवले होते. पण, मोदी यांच्या आगमनाची कल्पना नव्हती. अचानक अर्ध्या तासापूर्वी पीएम मोदी येणार असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान येताच त्यांनी विचारले काय तयारी केली? मी चहा बनवला आहे असे म्हटल्यावर त्यांनी थंड चहा द्या असे सांगितल्याचे मीरा यांनी म्हटले.

कोण आहे हे निषाद कुटुंबीय?

प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला जात होते त्यावेळी निषाद राज यांनी बोटीने त्यांना शरयू नदी पार करून दिली. राम मंदिर परिसरात निषाद राज यांना समर्पित मंदिर बांधण्याचीही योजना आहे. ज्यामध्ये त्यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. अयोध्येला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी यांनी ज्या निषाद कुटुंबाची भेट घेतली ते निषाद राज यांचे वंशज असल्याचे सांगितले जाते.