हुबेहुब जया किशोरी वाटणाऱ्या कोण आहेत पलक किशोरी, लहान वयात झाल्या कथावाचक

| Updated on: Jun 18, 2023 | 8:21 PM

कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी अनेकदा चर्चेत असतात. जया किशोरी हे आजचा चर्चेतील व्यक्तीमत्व आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत पलक किशोरी ?

हुबेहुब जया किशोरी वाटणाऱ्या कोण आहेत पलक किशोरी, लहान वयात झाल्या कथावाचक
palak and jaya kishori
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : कथावाचक आणि मोटिवेशन स्पिकर जया किशोरी ( Jaya Kishori ) या कायम चर्चेत असतात. त्यांच्या अध्यात्मिक प्रवचनाचे देशभरात लाखो श्रोते आहेत. अवघ्या 27 व्या वर्षी त्यांना देशभरात ओळखले जात आहे. जया किशोरी अलिकडे मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असणारे धीरेंद्र कृष्ण शास्री ( Baba Bageshwar ) यांच्याशी लग्नबंधनात अडकणार अशा बातम्या आल्याने खूपच चर्चेत आल्या होत्या. तर आता अशा या कायम प्रकाश झोतात राहणाऱ्या जया किशोरी यांना टक्कर देण्यासाठी आता पलक किशोरी ( Palak Kishori ) ही तरूणी आली आहे. कोण आहे पलक किशोरी पाहूयात..

पलक किशोरी सध्या चर्चेत असून तिलाही जया किशोरी यांच्याप्रमाणेच अध्यात्मिक कथावाचनाची आवड आहे. तिचा बोलण्याची शैली आणि चेहरा देखील जया किशोरी यांच्या सारखाच आहे. त्यांना जया किशोरी यांची शिष्या मानले जात आहे. परंतू पलक किशोरी कोण आहे ? हेच त्यांचे खरे नाव आहे का ?

कोण आहे पलक किशोरी

पलक किशोरी कथावाचकच आहेत. त्या केवळ सतरा वर्षांच्या आहेत. पलक हीचे गाव मध्य प्रदेशातील रीवा आहे. पलक सतना पालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी असलेल्या रमाकांत शु्क्ला यांची नात आहे. तर सतीश मिश्रा यांची कन्या आहे. पलक हीचे खरे नाव शांभवी मिश्रा आहे. पलक हीच्या घरात धार्मिक वातावरण लाभल्याने तिने लहानपणापासून कथावाचन आणि धार्मिक अनुष्ठान तसेच धार्मिक पुस्तकांच्या वाचनात बालपण गेले आहे.

जया किशोरी यांच्याशी तुलना

पलक आता 12 वीला असून तिची हिंदी भाषेसोबतच इंग्रजीवरही चांगली पकड आहे. पलक जेव्हा श्रीमद भागवत कथा आणि कृष्ण कथेचे वाचन करते. तसेच अधून मधून मोटिवेशन भाषणेही देत असते. पलक हीलाही जया किशोरी यांच्या पावलांवर पाऊल ठेवून सोशल मिडीयावर अध्यात्मिक कथावाचन करीत आहे. त्यामुळे सहाजिकच जया किशोरी यांच्याशी तुलना होणे आलेच. तसेच दिसायला देखील ती किशोरी यांच्या सारखीच असल्याने तिचेही सोशल मिडीयावर फॉलोअर वाढत आहेत.