उत्तर प्रदेशातील संभल येथे मस्जिदच्या जागी हिंदू मंदिर असल्याच्या दाव्यानंतर कोर्टाच्या आदेशाने सर्वेक्षण झाले आहे. त्यादरम्यान झालेल्या हिंसेत अनेक लोकांची मृत्यू झाला होता. आता यानंतर राजस्थानातील प्रसिद्ध अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाह देखील वादात सापडला आहे. या दर्गाहच्या खाली कोणे एकेकाळी मंदिर होते असा दावा करणारी एक याचिका खालच्या कोर्टाने दाखल करुन घेतली आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे.
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती एक सुन्नी मुस्लीम तत्वज्ञानी, विद्वान आणि संत होते. जे इराण येथून भारतात आले होते. त्यांना सुल्तान-ए-हिंद आणि गरीब नवाझ या नावाने देखील प्रसिद्धी मिळाली होती. राजस्थानातील अजमेर येथे त्यांनी त्यांचा मठ स्थापन केला होता.हा मठ इंडो- इस्लामिक वास्तुकलेचा अद्भूत नमूना आहे.
मोईनुद्दीन यांचा जन्म ११४१ मध्ये पर्शियाच्या सिस्तान येथे झाला होात. जे आजच्या इराणमध्ये अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे.त्यांना पैगंबर मोहम्मद साहब यांच्या वंशज मानले जाते. १४ वर्षांचे असताना ते अनाथ झाले होते. अचानक एके दिवशी त्यांची भेट फकीर इब्राहिम कंदोजी यांच्याशी झाली होती. मोईनुद्दीन यांच्यावर लिहिलेले पुस्तक मेहरु जफर याच्यानुसार जेव्हा मोईनुद्दीन यांनी कंदोजी यांना विचारले की जीवनात एकटेपणा, मृत्यू आणि संकट याच्याशिवाय काही आहे का? तेव्हा त्यांना कंदोजी यांनी उत्तर दिले की प्रत्येक मानावाने सत्याचा शोध घेतला पाहीजेत…
त्यानंतर मोईनुद्दीन सत्याच्या शोधार्त निघाले.२० वर्षांचे असतान त्यांनी दर्शन, व्याकरण आणि अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी खुखारा आणि समरकंद येथे गेले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या हेरात येथे त्यांची भेट ख्वाजा उस्मान हरुनी यांच्याशी झाली.त्यांच्याकडे राहून त्यांनी अध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले. तेथून त्यांचा चिश्ची बनण्याचा प्रवास सुरु झाला. अफगाणिस्तानात कुतुबुद्दीन बख्तियार काकी त्यांचे पहिले शिष्य झाले. कुतुबुद्दीन सोबत ते मुल्तानला गेले आणि पाच वर्षे राहीले. त्यावेळी त्यांची भेट हिंदू विद्वानांशी झाली. त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले.त्यानंतर लाहोर येथील अली हुजवीरी दर्गाह येथे ते पोहचले.
लाहोरवरुन मोईनु्द्दीन दिल्ली आणि नंतर अजमेरला आले. त्यावेळी अजमेर पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. त्यावेळी ते ५० वर्षांचे होते. पृथ्वीराज तृतीय यांचे राज्य होते आणि त्यांचे राज्य पसरु लागले. त्याच वेळी मोहम्मद घोरीने आक्रमण केले. तेहरान दुसऱ्या युद्धात ११९२ मध्ये पृथ्वीराज यांचा पराभव झाला. त्यानंतर मोहम्मद घोरी याच्या सैन्याने कत्तली केल्या.
अजमेरची अवस्था पाहून मोईनुद्दीन चिश्ती यांनी लोकांच्या सेवेसाठी येथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची भेट बीबी उम्मातुल्ला यांच्याशी झाली. त्यांनी येथेच मातीचे घर बनविले आणि लोकांची सेवा सुरु केली. त्यानंतर ते गरीब, अनाथ आणि असहाय्य यांचे पालन पोषणकर्ते बनले. येथे लोक शांततेच्या शोधात येऊ लागले. येथे त्यांना गरीब नवाझ पदवी मिळाली. येथे लंगर रोज चालू लागला आणि तेथे सर्वांसाठी अन्न मिळू लागले. सर्व धर्मियांचे येथे स्वागत होऊ लागले. येथे हिंदू संत देखील येऊ लागले.
मोईनुद्दीन चिश्ती एकात्मवादाचा प्रसार करायचे. ते समानता, प्रेम आणि मानवतेच्या गोष्टी बोलायचे. चिश्ती परंपरा १० व्या शतकात हेरात येथे सुरु झाली होती. मोईनुद्दीन आणि त्यांच्या शिष्यांनी तिचा विस्तार केला. मोईनुद्दीन चिश्ती यांचे पहिले शिष्य कुतुबुद्दीन बख्तियार काकी हे इल्तुतमिश यांचे गुरु होते. कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावानेच कुतुब मीनार उभारण्यात आले आहे, त्यांची दर्गाह मेहरौली येथे आहे.
कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांचे शिष्य बाबा फरीद पंजाब येथे गेले, निजामुद्दीन औलिया देखील याच परंपरेतील सुफी संत होते. त्यांची दर्गाह दिल्लीत आहे. मुगल बादशाह अकबर यांच्यावरही त्यांचा प्रभाव होता.अकबराने त्यांच्या दर्गाहचे सौदर्यीकरण केले. त्यानंतर येथे मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. मुघलकाळात अजमेर दर्गाह खूप प्रसिध्द झाली, त्यांच्या दर्ग्यावर माथा टेकायला मोहम्मद बिन तुगलक, हुमायू , शेरशाह सुरी, अकबर आणि दाराशिकोह पासून औरंगजेब