पाकिस्तानात का उभी आहे ही भारतीय ट्रेन ? काश्मीर प्रश्नाशी आहे संबंध..

| Updated on: Dec 11, 2024 | 3:17 PM

भारताची एक ट्रेन पाकिस्तानाच्या हद्दीत गेली पाच वर्षे उभी आहे. आता तर या ट्रेनच्या बोगी देखील गंजून सडत चालल्या आहेत. तरी हे डबे भारतात येऊ शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाकिस्तानात का उभी आहे ही भारतीय ट्रेन ? काश्मीर प्रश्नाशी आहे संबंध..
Samjhauta Express
Follow us on

भारताची एक ट्रेन पाकिस्तानात गेल्या पाच वर्षांपासून उभी आहे. आत या ट्रेनची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तिच्या बोगी आता गंज लागून सडण्याच्या स्थितीत आहेत. तरी देखील ही ट्रेन भारतात येऊ शकत नाही. अखेर काय कारण आहे या मागे? काय आहे नेमकी या ट्रेनची कहाणी ? आणि ही ट्रेन पाकिस्तानात कशी काय पोहचली ? चला तर पाहूयात या ट्रेनमागची कहाणी काय ?

भारत आणि पाकिस्तानात जेव्हा साल १९७१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फीकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला होता. तेव्हा समझौता एक्सप्रेसची पायाभरणी झाली होती. २२ जुलै १९६७ रोजी अटारी आणि लाहोर दरम्यान ही ट्रेन सुरु झाली होती. सुरुवातीला ही ट्रेन रोज चालविली जात असायची. नंतर १९९४ मध्ये या समझौता एक्सप्रेसला आठवड्यातून दोनदाच चालवण्याचा निर्णय झाला.परंतू नरेंद्र मोदी सरकारने जेव्हा २०१९ मध्ये कश्मीरमधून कलम ३७० हटविले त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण होऊन पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस बंद केली. त्यावेळी भारतीय रेल्वेचे ११ डब्बे लाहोरमध्ये होते. ते अजूनही तेथेच आहेत. तसेच पाकिस्तानच्या ट्रेनचे १६ डब्बे देखील भारताच्या अटारी रेल्वे स्थानकात होते ते अजूनही तेथेच उभे आहेत.

करार काय झाला होता

भारतासोबत रेल्वे करारानुसार असे ठरले होते की जुलै ते डिसेंबरपर्यंत सहा महिन्यांपर्यंत भारतीय डब्यांची ट्रेन पाकिस्तानात जाणार आणि त्यावेळी इंजिन पाकिस्तानचे असणार तर जानेवारी ते जूनपर्यंत पाकिस्तानचे डबे असणार. परंतू जेव्हा रेल्वे सेवा बंद करण्यात आली तेव्हा भारतीय डब्बे पाकिस्तानात होते. वाघा रेल्वे स्थानकाचे मॅनेजरच्या मते पाकिस्तानवरुन भारताला संदेश पाठविण्यात आला होता की या डब्यांना भारताच्या हद्दीत खेचून न्यावे तर भारताने तेथून आपल्या हद्दीत घेऊन जावे. परंतू आधी भारत-पाकिस्तानात झालेल्या करारानुसार पाकिस्तानच्या इंजिनाने या डब्यांना भारतात आणायचे होते.

हे सुद्धा वाचा