मुंबईत 8 जुलै रोजी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे मुंबई जलमय झाली. त्यानंतर हवामान विभागाने 9 जुलै रोजी देखील असाच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला, त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली. परंतू प्रत्यक्षात चक्क ऊन पडले. त्यामुळे शाळेतील मुलांना सुटीचा आनंद घेता आला असला तरी हवामान विभागाचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरल्याने हवामान खाते विनोदाचा विषय ठरले आहे. भारतीय हवामान खात्याचे अंदाज वारंवार का चुकतात ? हवामान शास्र पुरेसे विकसित झालेले नाही का ? नेमके हे का होत आहे. IMD चा पावसाचा अंदाज अजूनही का चुकतो ? आपली यंत्रणा अजूनही चाचपडतेय का ? या विषयाचा घेतलेला हा धांडोळा….
जगात सर्वत्र दोन ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. परंतू आपल्या येथे एक ‘एस्क्ट्रा’ ऋतू आहे तो म्हणजे पावसाळा. या पावसाळ्यावर भारताला शेती प्रधान देश म्हटले जाते. त्यामुळे हवामानाचा अंदाज वर्तविण्याचे प्रयत्न अनेक काळापासून सुरु आहेत. हवामानाचा अंदाज म्हणजे एखाद्या स्थानासाठी आणि वेळेतील वातावरणाची नेमकी काय स्थिती असेल यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हजारो वर्षांपासून अनौपचारिकरित्या हवामानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू 19 व्या शतकापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरुन औपचारिकरित्या हवामानातचा अंदाज लावायला लोक शिकले. हवामानाचा अंदाज एखाद्या ठराविक ठिकाणी असलेल्या वातावरणाच्या सद्यस्थितीबद्दल परिमाणात्मक डाटा गोळा करून आणि वातावरणात नेमके कसे बदल होतील हे प्रोजेक्ट करण्यासाठी हवामानशास्त्राचा आधार घेतला जातो. यापूर्वी बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरणं सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता यासाठी संगणक तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जातो.
हवामान अंदाज वर्तविण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज लागते. सर्वोत्तम संभाव्य मॉडेल निवडणे आवश्यक गरजेचे असते, ज्यात नमुना ओळखण्याची कौशल्ये, दूरसंचार, मॉडेलच्या कामगिरीचे ज्ञान आणि मॉडेल बायपासचे ज्ञान असणे आवश्यक असते. हवामानाचे अव्यवस्थित स्वरूप, वातावरणाचे वर्णन करणारे समीकरण सोडविण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड संगणकीय शक्ती, प्रारंभीची परिस्थिती मोजण्यात केलेली त्रुटी आणि वातावरणीय प्रक्रियेची अपूर्ण समज यामुळे हवामानाचे पूर्वानुमान आजही शंभर टक्के खरे नसते. म्हणूनच, वर्तमान वेळ आणि ज्यावेळेसाठी अंदाज केला जात आहे त्या दरम्यानचा फरक (अंदाजाची श्रेणी ) वाढत असल्याने अंदाज चूकण्याचे शक्यता वाढते. एन्सेम्बल्स आणि मॉडेल एकमतचा वापर त्रुटी कमी करण्यात आणि बहुधा संभाव्य निकाल घेण्यास मदत करतो.
हवामानाच्या अंदाज वर्तविण्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे हवामानातील बदलाचा सावधानतेचा इशारा देणे महत्वाचे असते. कारण या हवामान अंदाजाने प्राण आणि मालमत्तेचे रक्षण होते. तापमान आणि पावसाचा अंदाज शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे पावसाचे अंदाज कमोडिटी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचे ठरतात. हवामानचा अंदाज घेऊन सर्वसामान्य लोक त्या दिवशी काय कपडे घालायचे हे देखील ठरवतात. मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि थंड वारा यामुळे घराबाहेर काम करणे कठीण होत असल्याने, पूर्व नियोजन करण्यासाठी प्रतिकूल हवामानापासून बचाव करण्यासाठी देखील हवामानाचा अंदाज वापरतो. इ.स.2001 मध्ये अमेरिकेने हवामानाच्या अंदाजावर तब्बल 5.1 अब्ज डॉलर्स खर्च केले.
मुंबईत 9 जुलै रोजी यलो अलर्ट जारी केला होता. तर कोकणात घाट मार्गावर रेड अलर्ट जारी केला होता. या रेड, यलो आणि ग्रीन अलर्टचा नेमका काय अर्थ असतो. याविषयी सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असते. तर पाहूयात हवामान विभागाच्या यलो, रेड अलर्टच्या इशाऱ्याचा नेमका काय अर्थ असतो.
ग्रीन अलर्ट – सर्वकाही सुरळीत आहे. घाबरण्याची काही चिंता नाही.
येलो अलर्ट – हा सावध राहा असा संदेश देणारा अलर्ट आहे. हवामानात काही दिवस मोठ्या घडामोडी होतील. हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते.पावसाने किंवा वीजा चमकण्याने तुमचे दैनंदिन जीवन विचलित होऊ शकते. 7.5 ते 15 मिमी पाऊस होऊ शकतो.
ऑरेंज अलर्ट – कोणत्याही संकटासाठी नागरिकांना तयार करण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो. वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीजपुरवठा बंद होणे, वाहतूक ठप्प होणे, यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असा हा इशारा असतो. कमाल 33 मिमी इतका पाऊस होऊ शकतो.
रेड अलर्ट – नैसर्गिक संकटात नागरिकांना सर्तक राहण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी होतो. लोकांना स्वत:ला आणि इतरांना सुरक्षित राखावे, धोकादायक भागात जाऊ नये. नैसर्गिक संकटाने मोठी आपत्ती येऊ शकते तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो. 30 मिमीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता असते.
डोंगराळ भागात ढगफूटीच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. केवळी अतिवृष्टी म्हणजे ढगफूटी नाही. तर सुमारे 10 किमी बाय 10 किमी क्षेत्रफळात एका तासात जर 10 सेंटीमीटर (100 मिलीमीटर ) किंवा त्याहून अधिक पाऊस होणार असेल तर त्याला ढगफूटी म्हणतात. अर्ध्यातासात जर 5 सेमी पाऊस पडत असेल तर त्याला ढगफूटी म्हटले जाते. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 24 तासांत 94 सेंटीमीटर पाऊस पडला होता. भारतात वर्षभरात साधारण सरासरी 116 सेंटीमीटर पाऊस होतो, परंतू काही भौगोलिक भागात याहून 10 पट अधिक पाऊस पडत असतो. ढगफूटी ही असामान्य स्थिती आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात पावसाळ्यात ढगफूटीच्या घटना घडत असतात. त्यामुळे प्रचंड नैसर्गिक आणि मनुष्यहानी होते.
भारत उष्णकटिबंधीय प्रदेशात मोडत असल्याने देशात वेगवेगळे हवामान झोन आहेत. हवामान खाते नऊ प्रमुख प्रारुपांचा अभ्यास करुन त्याचा सारांश काढून अंदाज देते. प्रत्येक प्रारुपात काही त्रूटी असू शकतात. मुंबई, कोलकाता, चेन्नई या समुद्राच्या किनाऱ्यांवरील शहरातील अंदाज चुकू नये याची काळजी घेतली जाते. मुसळधार ते अतिमुसळधार असा अंदाज चुकू नये याची काळजी घेतली जाते. हवामान अंदाज सांगताना सरकारचा आपत्ती यंत्रणा दक्ष असावी असा हेतू असतो. अनेकदा त्रूटी होतात. परंतू तरीही पूर्वी अंदाजाची अचूकता 60 ते 65 टक्के इतकी होती आता ती 85 टक्क्यांपर्यंत सुधारल्याचा दावा हवामान खात्याच्या संशोधकांनी केला आहे. डॉप्लर रडाराच्या मदती पुढील तीन ते चार तासांचा अंदाज अचूक वर्तविता येतो. परंतू पुढील जादा काळाचा अंदाज वर्तविण्यासाठी विविध प्रारुपांची आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो असेही हवामान संशोधकांचे म्हणणे आहे.
भारतीय मान्सून ही एक गुंतागुंतीची पर्यावरणातील घटना आहे जी एकमेकावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबून असते. भारतातील मान्सूनच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, तीन प्रमुख घटकांचा अभ्यास तज्ज्ञांना करावा लागतो.
भारताचे क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.42 टक्के क्षेत्र भारताने व्यापली आहे. भारताची दक्षिण उत्तर लांबी 3,214 किलोमीटर आणि पूर्व-पश्चिम विस्तार हा 2,933 किलोमीटर आहे. भारताच्या मुख्य भूमीचा लाभलेला समुद्रकिनारा हा 6100 किलोमीटर आहे. भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे राष्ट्र आहेत, तर भारताच्या उत्तरेस चीन नेपाळ भूतान तिबेट ही राष्ट्रे आहेत. भारतामध्ये आपण जर या रचनेचा विचार केला तर भारतात द्वीपकल्पात मोडतो. द्वीपकल्प म्हणजे तीन बाजूने समुद्र आणि एका बाजूने जमीन असलेला भूभाग. जर आपण भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या उत्तरेस देश आहेत आणि बाकी तिन्ही बाजूने पाणी आहेत त्याला द्वीपकल्प असे म्हणतात.
भारत देशाचे हवामान हे मान्सून या प्रकारात मोडते. कारण भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्ताच्याजवळ सूर्याची किरणे लंबरूपात पडत असतात आणि त्यामुळे येथील तापमान अधिक वाढत जाते. भारतामध्ये सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते.
उन्हाळ्यात राजस्थानमध्ये तापमान हे सगळ्यात जास्त असते. भारतामध्ये उन्हाळा मार्च ते मेपर्यंत असतो. पावसाळा जून ते सप्टेंबर असतो आणि परतीचा मान्सून ऑक्टोबर ते नोव्हेंबर असतो आणि हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी असतो. अशा प्रकारे भारतामध्ये मुख्य तीन ऋतू आहेत, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ते तीन ऋतू आहेत. जगामध्ये फक्त दोनच ऋतू असतात उन्हाळा आणि हिवाळा. भारत हा एकमेव असा देश आहे की जेथे आपण तीन वेगवेगळे ऋतू अनुभवत असतो, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा. हे भारताचे वैशिष्ट्य आहे.
हवा ( climate ) म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती. एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. हवा नेहमी बदलत असते ते बदल सहजपणे जाणवतात आणि हवामान सर्वत्र सारखे नसते. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात ते सहजपणे जाणवत नसतात. उदाहरणार्थ मुंबईचे हवामान दमट आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. हवामानाचा अंदाजाचे विविध उपयोग आहेत, त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या संकटाचे म्हणजे अतिवृष्टी तापमानातील बदल, पूरजन्यस्थिती इत्यादीची कल्पना येते आणि त्यापासून आपला बचाव होतो.