ट्रक हे भारतातीलच नाही तर जगभरातील दळण वळणाचं साधण आहे. ट्रकच्या मदतीनं तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या सामानाची ने आण करू शकतात. बाजारात सध्या विविध प्रकारचे ट्रक उपलब्ध आहेत. सहा चाकी पासून ते अगदी दहा चाकी पर्यंत ट्रक सध्या आपल्याला रस्त्यावर धावतात दिसतात. मात्र या सर्व ट्रकमध्ये एक कॉमन गोष्ट दिसते ती म्हणजे प्रत्येक ट्रकच्या मागे ओके लिहिलेलं असतं, मात्र हे ट्रकवर ओके का लिहितात याचा तुम्ही कधी विचार केलायेत का? याबाबत अनेकांची वेगवेगळी मत असू शकतात. मात्र याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या महायुद्धात सापडतं.
ट्रकमध्ये इंधन म्हणून डिझेलचा वापर करतात. ट्रकच्या मदतीनं एका शहरातून दुसऱ्या शहरात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर काही ठिकाणी एका देशातून दुसऱ्या देशात देखील मालाची वाहतूक केली जाते. ट्रकचा प्रवास दूरचा असल्यामुळे ट्रकला मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून डिझेल लागतं.
मात्र दुसरं महायुद्ध सुरू असताना जगभरात डिझेल, पेट्रोलची टंचाई निर्माण झाली होती. मात्र युद्ध सामुग्री आणि अन्न-धान्याची वाहतूक करण्यासाठी ट्रकच्या फेऱ्या सुरूच ठेवाव्या लागणार होत्या. डिझेलची टंचाई असल्यामुळे ते सहजासहजी उपलब्ध होतं नव्हतं. मग अशावेळी ट्रकमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करावा असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. आणि यावर उपाय म्हणून ट्रकमध्ये रॉकेल अर्थात केरोसीनचा वापर सुरू झाला. मात्र रॉकेल हे डिझेल पेक्षा जास्त ज्वलनशील असल्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या. ज्यामध्ये ट्रकनं अचानक पेट घेणं, एखाद्या गाडीचा अपघात झाल्यानंतर लगेच तीला आग लागनं, इंजिन गरम होऊन वाहनानं पेट घेणं अशा समस्या निर्माण झाल्या. यावर उपाय काढण्यासाठी ट्रकवर ओके लिहिन्याची पद्ध सुरू झाली.
ओकेचा (OK ) अर्थ ऑन केरोसीन (on kerosene) असा होतो. त्या काळी जर एखाद्या ट्रकवर ओके लिहिलेलं असेल तर मागून येणारा दुसऱ्या गाडीचा चालक आपलं वाहन काळजीपूर्वक चालवत होता. यामुळे अपघाताची शक्यता कमी झाली. मात्र त्या काळात सुरू झालेली परंपरा आज देखील सुरूच आहे.