भारतात तयार होणाऱ्या AK-203 रायफलला मुस्लीम देशांकडून मागणी ? वैशिष्ट्ये काय ?

| Updated on: Sep 25, 2024 | 10:50 PM

आफ्रिकन आणि मध्य पूर्व देशांमधून भारतात तयार होणाऱ्या कलाश्निकोव्ह AK-203 असॉल्ट रायफलची मागणी वाढत आहे. मागणी वाढण्याचे कारण अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देश आहेत. जाणून घ्या या रायफलची मागणी का वाढत आहे आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत?

भारतात तयार होणाऱ्या AK-203 रायफलला मुस्लीम देशांकडून मागणी ? वैशिष्ट्ये काय ?
AK 203 Rifles
Follow us on

सध्या भारतात तयार होणार्‍या कलाश्निकोव्ह AK-203 असॉल्ट रायफलीला मोठी मागणी आहे. खास करुन आफ्रीकी आणि मिडल इस्ट देशातून या रायफलीला खूप मागणी आहे.या रायफलीची निर्मिती रशिया आणि भारत मिळून होत आहे. इंडो रशियन रायफल्स लिमिटेड (IRRPL) द्वारे भारतात या रायफलची निर्मिती केली जात आहे. ब्रह्मोस क्रुझ मिसाईल, आर्टिलरी गन, लाईटवेट टॉर्पेडो सह अनेक शस्रास्रांसह आता कलाश्निकोव्ह AK-203 देखील या मालिकेत रशिया आणि भारत मैत्रीतून तयार केली जात आहे.

रशिया आणि भारतीय संयुक्तपणे तयार करीत असलेल्या कलाश्निकोव्ह AK-203 असॉल्ट रायफलीला डीमांड वाढली आहे. आफ्रीकन आणि मध्य पूर्वेतील मुस्लीम देशांत एके -203 असॉल्ट रायफलीच्या वाढत्या मागणीला अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देश जबाबदार ठरले आहेत. डीफेन्स सेक्टरच्या तज्ज्ञांच्या मते ही वाढती मागणी भारताचे आफ्रीकी आणि मध्य पूर्वेतील देशांशी संबंध वाढवू शकते. तसेच डिफेन्स सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि भारताच्या आत्मनिर्भर मोहीमेला यामुळे उभारी मिळणार आहे. या नवीन कलाश्निकोव्ह AK-203 असॉल्ट रायफलीची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात…

या रायफलीची वैशिष्ट्ये काय ?

ही रायफल एके-200 रायफलीची अत्याधुनिक आवृत्ती आहे. कलाश्निकोव्ह एके-203ची फायरिंग रेंज 400-800 मीटर आहे. एका मिनिटाला ही 700 राऊंड फायर करते. यात डिटेचेबल मॅगझीनचा वापर होतो. मार्चमध्ये या रायफलीच्या सुरुवातीच्या डिलिव्हरी आधीच भारतीय सैन्याने हीच्या चाचण्या केल्या आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ही विश्वासार्ह रायफल म्हणून ओळखली जाते. हीची अचूक क्षमता वाढण्यासाठी तिला अनेक तांत्रिकबाबी जोडल्या आहेत. ऑप्टीक, कोलीमेटर, नाईट आणि थर्मल इमेजिंग स्कोप लावण्याची सोय देखील आहे. 3.8 किलो वजनाची ही रायफल कोणत्याही वातावरणात निराश करीत नाही. अमेठी येथील कोरवा ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत हीची निर्मिती करण्यात आली आहे.

भारतीय AK-203 असॉल्ट रायफलला मागणी का ?

मध्य पूर्व आणि आफ्रीकी देशात कलाश्निकोव्ह एके-203 मागणी वाढण्यामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांद्वारा रशियावर निर्बंध घालणे जबाबादार ठरले आहे. या प्रतिबंधांमुळे या रायफली रशियातून विक्री होणे बंद झाले.त्यामुळे भारत आणि रशियात तयार होणाऱ्या या रायफली विकून भारताचा फायदा झाला आहे.