दिल्लीतील रस्त्याला दाराशिकोहचे नाव का दिले नाही ? औरंगजेब वादावर आरएसएसचा सवाल

| Updated on: Mar 23, 2025 | 3:05 PM

लोक औरंगजेबाच्या भाऊ दाराशिकोहला आपला आयकॉन का नाही मानत ? दिल्लीतील मार्गाचे नाव औरंगजेब ठेवले होते. ते दाराशिकोह का नाही ठेवले ? असा सवाल आरएसएसचे सह कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केला आहे.

दिल्लीतील रस्त्याला दाराशिकोहचे नाव का दिले नाही ? औरंगजेब वादावर आरएसएसचा सवाल
Follow us on

कर्नाटकातील बंगळुरू येथे आरएसएसचे तीन दिवसीय चिंतन शिबीराचा आजचा तिसरा अखेरचा दिवस होता. या प्रसंगी आरएसएसचे सह कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले यावेळी की औरंगजेबाने जे काही केले त्याला आयकॉन मानू नये.. दिल्लीत औरंगजेब मार्ग होता, ज्याचे नाव बदलून डॉ. अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले आहे. या मागे निश्चित काही कारण होते. औरंगजेबाचा भाऊ दाराशिकोह याला का हीरो नाही बनवले ? गंगा जमुनी तहजीबची वकीली करणाऱ्यांनी कधी दाराशिकोहला पुढे आणण्याचा विचार का नाही केला ? आपण जो भारताच्या संस्कृती विरुद्ध होता त्याला आयकॉन करावे की ज्याने या भूमीच्या परंपरेनुसार काम केले होते त्याला करावे ?

दत्तात्रेय होसबाळे पुढे म्हणाले की स्वातंत्र्याची लढाई केवळ इंग्रजांविरुद्ध लढली नव्हती, शिवाजी आणि महाराणा प्रताप यांनी मुघलांविरोधात स्वांतत्र्यांची लढाई लढली होती. तो देखील स्वातंत्र्याचा संग्राम होता. देशातील लोकांनी ठरवावे लागेल की त्यांना आपला आयकॉन औरंगजेबाला करायचे की दाराशिकोहला ?

हे सुद्धा वाचा

येथे पोस्ट पाहा –

भारतात कोणाला आयकॉन बनवायचे ?

दत्तात्रेय होसबाळे पुढे म्हणाले की भारताच्या लोकांना ठरवावे लागेल की भारताच्या इतिहासाविरुद्ध चालणाऱ्या व्यक्तीला आपले आयकॉन बनवायचे की देशाची संस्कृती, परंपरा आणि मातीच्या सोबत जे लोक राहीले होते, त्यांना आपले आयकॉन बनवायचे. यासाठी असली मुद्दा हा आहे की औरंगजेब यात फिट बसत नाहीत. औरंगजेबाचे भाऊ दाराशिकोह या आयकॉनमध्ये फिट्ट बसतात. ते म्हणाले की एक स्वतंत्र देशाला हे गंभीरतेने विचार करावा लागेल की आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले होते ? इंग्रजांआधी आलेल्या आक्रमकांविरोधात देशाच्या शूर वीरांनी ही लढाई लढली आहे.

कबरीचा वाद सुरुच

महाराष्ट्रात मुघल शासक औरंगजेब याच्या कबरीवरुन राजकारण तापले आहे. छत्रपती संभाजीनगरात जे आधी औरंगाबाद नावाने ओळखले जात होते, तेथे औरंगजेबाची कबर आहे.या कबरीवरुन सुरु झालेला वाद सुरुच आहे.राज्यात या मुद्द्यावर राजकारण तापले आहे.आता संपूर्ण प्रकरण कोर्टात पोहचले आहे. हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल झाली आहे. कोर्टात औरंगजेबच्या कबरीला राष्ट्रीय स्मारकांचा दर्जाच्या यादीतून हटविण्याचे आदेश जारी करण्याची मागणी केली आहे.