नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : बंगळुरुच्या श्रीहरिकोटा येथून सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले सौरयान आदित्य एल-1 रवाना झालेले आहे. पुढील चार महिने जवळपास 15 लाख किमीचा प्रवास करीत आदित्य एल-1 मुक्कामी पोहचणार आहे. या पृथ्वी आणि सुर्याच्या मध्यभागी लॅंग्रेज पॉईंट एल-1 वर यान पोहचण्यासाठी 125 दिवस लागणार आहेत. एकदा का मुक्कामी यान पोहचले की त्याच्यावरील पेलोड सुर्याचा गहन अभ्यास करणार आहे. परंतू या यानाची निर्मिती करतानाचे काही बाबी तुम्हाला आश्चर्यचकीत करतील यानाच्या मुख्य पेलोडवर काम करताना संशोधक आणि इंजिनिअरना परफ्युम किंवा स्प्रे लावून येण्यास सक्त मनाई होती. काय आहे या मागील कारण ?
सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. आदित्य एल-1 पंधरा लाख किमीवर पोहचून सुर्याचा अभ्यास करणार आहे. ही मोहिम भारताच्या पुढील मोहिमासाठी उपयोगी ठरणार आहे. भारताची ही पहीलीच सुर्य मोहीम असून ती संपूर्ण स्वदेशी मोहीम आहे. भारताला यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. आदित्य एल-1 चा मुख्य पेलोड निर्मिती भारतीय खगोल भौतिक संस्थेच्या टीममार्फत होत होती. या टीमला काम करताना कोणतेही परफ्युम सुंगधित अत्तर किंवा डीओ इतकेच काय मेडीसिनचा स्प्रेचा वापर करण्यास सक्त मनाई होती. टाईम्सच्या बातमीनूसार याचे कारण एकही कण आदित्यच्या मुख्य पेलोड व्हीजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफचा ( व्हीईएलसी ) खेळ बिघडवू शकला असता.
इस्रोचे सौर मोहिमेचे आदित्य एल-1 चा मुख्य पेलोड तयार करताना संपूर्ण निर्जंतूक वातावरणाची गरज होती. त्यामुळे संशोधकांना आणि इंजिनिअरना काम करताना क्लीन रुम ठेवावी लागायची. त्यांची प्रयोगशाळा आयसीयुच्या एक लाखपट स्वच्छ ठेवावी लागायची. त्यासाठी सहा तासांच्या ड्यूटीमध्ये प्रत्येकाला रुममध्ये प्रवेश करताना खूपच काळजी घ्यावी लागायची. प्रत्येक जणांना स्पेस सुटसारखा सुट परिधान करावा लागायचा. शिवाय अल्ट्रासॉनिक स्वच्छता प्रक्रीयेतून बाहेर पडून प्रवेश करायला परवानगी होती.
व्हीईएलसी तांत्रिक टीमचे प्रमुख नागाबुशाना एस यांनी सांगितले की क्लीन रुमला रुग्णालयाच्या एक लाख पट स्वच्छ ठेवावे लागत होते. आम्ही HEPA ( उच्च क्षमतेचे पार्टीकुलेट एअर फिल्टर, आयसोप्रोपिल अल्कोहल आणि कठोर प्रोटोकॉलचे पालन केले. कारण बाहेरील कोणत्याही कणाने व्यत्यय आणू नये. व्हीईएलसी टीमचे सदस्य आयआयए सनल कृष्णा यांनी सांगितले की एक जरी कण आत आला असता तरी अनेक महिन्यांचे कष्ट वाया गेले असते.