पत्नी सकाळी उशीरा उठते, ऑफीसला उपाशीपोटीच जावं लागतं – पतीची तक्रार ऐकून पोलिसांनी डोक्यावर मारला हात !

| Updated on: May 07, 2024 | 1:00 PM

नवरा-बायकोचं नात म्हटलं की भांडण हे आलंच, कधी ते लुटूपुटूचं असतं तर कधी खरंच उग्र रूप धारण करतं. पण घरोघरी मातीच्या चुली.. या म्हणीप्रमाणेच प्रत्येक घरात पती-पत्नीमध्ये मतभेद हे होतच असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये पत्नीच्या वागण्यामुळे कंटाळून एका पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पण त्याने सांगितलेली तक्रार ऐकून अधिकारी हैराण झाले

पत्नी सकाळी उशीरा उठते, ऑफीसला उपाशीपोटीच जावं लागतं - पतीची तक्रार ऐकून पोलिसांनी डोक्यावर मारला हात !
Follow us on

नवरा-बायकोचं नात म्हटलं की भांडण हे आलंच, कधी ते लुटूपुटूचं असतं तर कधी खरंच उग्र रूप धारण करतं. पण घरोघरी मातीच्या चुली.. या म्हणीप्रमाणेच प्रत्येक घरात पती-पत्नीमध्ये मतभेद हे होतच असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये पत्नीच्या वागण्यामुळे कंटाळून एका पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पण त्याने सांगितलेली तक्रार ऐकून अधिकारी हैराण झाले आणि त्यांनी डोक्यालाच हात मारला. बायकोची तक्रार करण्यासाठी त्याने थेट पोलिस स्टेशन गाठलं. माझी पत्नी रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरते , आणि सकाळी उशीरा उठते. त्यामुळ मला ऑफीसमध्ये उपाशीपोटी जायला लागतं, अशी तक्रार त्याने पोलिसांसमोर केली. पत्नी सकाळी उठेपर्यंत तिचा पती ऑफीसमध्ये पोहोचलेला असतो.

या सवयीला कंटाळून पतीने त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. पत्नीपासून सुटका हवी आहे, अशी विनंती पतीने पोलिस ठाण्यात केली. वेळेवर जेवण न मिळाल्याने माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. जी मला वेळेवर जेवणही देऊ शकत नाही, अशा बायकोसोबत मला रहायचच नाही असं सांगत त्याने विभक्त होण्याची मागणी केली. मात्र त्या तरुणाचं बोलणं ऐकून अधिकारी हैराण झाले. तरीही त्यांनी आधी गुन्हा दाखल केला आणि नंतर पती-पत्नी दोघांनाही समजावून, शांत करून घरी पाठवले.

एवढुशा गोष्टीवरून थेट पोलिसांत जातात लोकं

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल अशा अनेक घटना समोर येत आहेत ज्यात क्षुल्लक कारणावरून पती-पत्नी पोलिस ठाण्यात पोहोचतात. काही प्रकरणं अशी असतात जिथे समजूत घालून, मन वळवून प्रकरण मिटवले जाते, पण काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करावे लागतात. एका आकडेवारीनुसार, 1500 प्रकरणांमध्ये समजावून वाद मिटवण्यात आला, तर 400 प्रकरणे अशी आहेत ज्यासाठी गु्न्हा दाखल करण्यात आला.

कधी भांडणामुळे, तर कधी पत्नी माहेरी गेल्यामुळे तर कधी पती अतिशय बिझी असल्यामुळे नवरा-बायकोत भांडण होतात आणि ते तक्रार घेऊन पोलिसांत येतात. काही वेळा समजावून तो वाद सोडवला जातो आणि प्रकरण तिथेच मिटतं. पण काही वेळा असं होतं की पती-पत्नी दोघंही ऐकायला तयार नसतात, कोणत्याही गोष्टीत समहती होत नाही अशा वेळी केस नोंदवली जाते, असे पोलिसांनी नमूद केले.