Waiting List | वेटिंग लिस्‍टची कटकट संपणार? प्रत्येकाला मिळणार कन्फर्म तिकीट, रेल्वेचा मेगा प्लॅन काय?

| Updated on: Jun 21, 2024 | 6:05 PM

रेल्वे प्रवास करताना तिकिटची वेटिंग लिस्ट ही सर्वात मोठी समस्या असते. या समस्येपासून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. रेल्वे प्रशासन ही समस्या सोडविण्यासाठी युध्द पातळीवर काम करत आहे. प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

Waiting List | वेटिंग लिस्‍टची कटकट संपणार? प्रत्येकाला मिळणार कन्फर्म तिकीट, रेल्वेचा मेगा प्लॅन काय?
RAILWAY TRAIN
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. कमी भाडे आणि देशातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात ट्रेनची उपलब्धता यामुळे ट्रेन हा भारतातील वाहतुकीचा सर्वात पसंतीचा मार्ग आहे. मात्र, या प्रवासात सर्वात मोठी अडचण असते ती लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कन्फर्म सीट मिळणे. रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या अनेक प्रवाशांची तिकिटे ही वेटिंग कॅटेगरीतच राहतात. त्यामुळे अनेक प्रवाशांना जनरल क्लासच्या डब्यातून प्रवास करावा लागतो. मात्र, आता या समस्येपासून प्रवाशांची सुटका व्हावी. प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट मिळावी यासाठी सरकार गांभीर्याने काम करत आहे. यानुसार सरकारने 2032 पर्यंत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ट्रेनमधील वेटिंग लिस्टची समस्या संपवण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर काम करत आहे. आरक्षण जागांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत कमी करणे हे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष्य आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे सेवेची क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वे संरचनेत बदल करून ती मजबूत केली जात आहे. या दशकाच्या अखेरीस प्रतीक्षा यादी पूर्णपणे काढून टाकण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी येत्या काही वर्षांत प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले जातील असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे जुना रोलिंग स्टॉक बदलला जाईल यामुळे रेल्वेच्या ताफ्यात 7 ते 8 हजार नवीन गाड्या समाविष्ट होतील. वेटिंग तिकिटांची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर करणार आहे.

भारतीय रेल्वे ट्रेनमधील उपलब्ध जागांचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त प्रवाशांना कन्फर्म तिकीट देता येईल. आरएसी (RAC) आणि वेटिंग तिकीट (WATING) प्रवाशांना धावत्या गाड्यांमध्ये बर्थ देण्यासाठी रेल्वे एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यामुळे टीसी मनमानीपणे वागू शकणार नाही. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम रेल्वेची इन हाउस सॉफ्टवेअर शाखा आणि एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉड्यूल विकसित करत आहे. गेल्यावर्षी त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. या एआय मॉड्युलमुळे रेल्वेला तिकिटे कशी बुक केली जातात. कोणत्या गंतव्यस्थानासाठी जास्त बुकिंग आहेत याची माहिती लगेच मिळेल. AI कडून मिळालेल्या डेटाच्या मदतीने रेल्वे सुमारे 6 टक्के अधिक कन्फर्म तिकिटे देऊ शकेल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.