नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या लाटेनं चीनचा बोजवारा उडालायं. दोन वर्षांपूर्वी चीननं जे पेरलं होतं., तेच त्यांच्याच भूमीत उगवलंय. मात्र एकटा चीनच नव्हे तर इतर ५ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेत. चीनच्या नव्या व्हेरियंमुळे भारताला धोका आहे का., आणि महाराष्ट्रासाठी एक दिलाश्याची गोष्ट काय आहे. अख्खं जग कोरोनाच्या क्रृर आठवणी विसरण्याच्या टप्प्यात आलाय. मात्र चीनमधली कोरोनाची परिस्थिती पुन्हा काळजाचा ठोका चुकवू लागली. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जग ज्या चीनमधून निघालेल्या विषाणूनं बंद पाडलं होतं., त्याच कोरोनानं आज चीनला बंद पाडलंय. कोरोनाच्या भीतीनं काही शहरांमध्ये दळण-वळण- वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय.
चीनमध्ये BF.7 या कोरोना व्हेरियंटचा फैलाव झालाय. माहितीनुसार बिजिंगमधली ७० टक्के लोक या व्हेरियटनं बाधित झालीयत. परिस्थिती इतकी बिकट बनलीय की नातलगांचे अत्यंसंस्कारही करता येत नाहीयत. मात्र तज्ज्ञांच्या मते भारतीयांसाठी चीनमध्ये पसरलेला BF.7 व्हेरियंट फार धोकादायक नसेल. पण ओमिकॉनप्रमाणेच आपण सतर्क राहणं गरजेचं आहे.
वेगानं फैलाव, लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, दीर्घकाळ ताप, खोकला ही bf.9 व्हेरियंटची लक्षणं आहेत. खबरदारी म्हणून भारत सरकारनं चीनमधून येणाऱ्यांची चाचणी सुरु केलीय. राज्यांना कोरोनाबाधितांचं जिनोम सिक्वेन्सिंगचं आवाहन केलंय बूस्टर डोस म्हणजे लसीचा तिसरा डोसवर भर दिला जातोय. चीनवगळता इतर पर्यटकांसाठी अद्याप नियम नाहीयत.
एक अंदाज असाही आहे की येत्या 3 महिन्यात कोरोना पुन्हा वेग धरु शकतो. चीनमधले ६० टक्के म्हणजे जवळपास ८० कोटी लोक बाधित होण्याची भीती आहे. अनेक दिवसांपासून एकट्या चीनमध्येच कोरोना वाढत होता. मात्र चीन पाठोपाठ अनेक देशांमध्ये वाढ होतेय.
1 नोव्हेंबरला जपानमध्ये 40 हजार रुग्ण होते., काल 72 हजार रुग्ण आढळले. याशिवाय ब्राझिलमध्ये 29 हजार 579 , दक्षिण कोरियात 26 हजार 622, अमेरिकेत 22 हजार 578 रुग्ण सापडले आहेत. दिलाश्याची गोष्ट म्हणजे भारतात सध्या फक्त काही शे रुग्ण वाढतायत. गेल्या 24 तासात भारतात फक्त 131 कोरोना रुग्ण आढळले. संपू्र्ण देशात 4500 रुग्ण सक्रीय आहेत. फेब्रुवारी 2022 पासून सलग 10 महिने भारतात कोणतीही मोठी रुग्णवाढ झालेली नाही.
महाराष्ट्राचं म्हणायचं तर गेल्या 24 तासात फक्त 20 रुग्ण निघाले. संपूर्ण राज्यात फक्त 132 जण कोरोनाबाधित आहेत. मुंबईत 36 आणि पुण्यात 48 कोरोनाचे रुग्ण उपचार घेतायत. या पलीकडे कोणत्याही जिल्ह्यात सक्रीय रुग्णांचा आकडा 5 हून मोठा नाही.
पण चीनमधली सध्याची अवस्था भीषण बनलीय. भारतात कोव्हिडबाधितालाही काळजीपूर्वक भरती केलं जातं. लहान मुलांच्या उपचाऱ्यासाठी दवाखान्यात पालक शब्दशः गुडघे टेकतायत. चिनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या त्रासाचा कंटाळून अनेक लोक रस्त्यांवर भांडू लागले. भारतात जशी रेल्वेत गर्दी असते., तरी गर्दी चीनमधल्या रुग्णालयांमध्ये आहे.
चीन सरकार मृत्यूचा आकडा जितका सांगतोय., त्याहून तिथलं वास्तव कैकपटीनं मोठं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यांवर शुकशुकाट आहे. कुरियर-ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प पडले आहेत. २ वर्षांपूर्वी चीननं जी विषवल्ली पेरली होती. त्याचाच फैलाव आज चीन भोगतोयत. तूर्तास आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे.