नवी दिल्ली | 23 फेब्रुवारी 2024 : रविवारपासून दोन दिवस राजधानी दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीट पार पडणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेली ही समीट दोन दिवस चालणार आहे. राजधानी दिल्लीत होणारा हा देशातील सर्वात मोठा इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये यंदा अनेक मान्यवर येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राजकारण, अर्थव्यवस्था, शासन आणि प्रशासनासहीत क्रीडा आणि सिनेसृष्टीशी संबंधित मुद्द्यांवर त्यात चर्चा होणार आहे. क्रीडा क्षेत्रावर माजी बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद हे भाष्य करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवला आहे, ज्यांनी भारताची मान उंचावली आहे, त्यांच्यापैकी पुलेला गोपीचंद हे एक आहेत. बॅडमिंटन कोर्टमध्ये खेळाडू आणि कोच म्हणून पुलेला गोपीचंद यांनी नाव लौकिक मिळवला आहे. पुलेला गोपीचंद हे दोन दशकांपेक्षाही अधिक काळापासून या खेळात सक्रिय भूमिका निभावत आहेत. त्यांनी फक्त एकट्यानेच यश मिळवलेलं नाहीये, तर अनेक तरुणांना घडवून त्यांना त्यांचं यश संपादन करण्यास मदतही केली आहे. अनेक तरुण खेळाडूंच्या
बॅडमिंटनच्या जगात भारतातील पहिले ग्लोबल सुपरस्टार आणि महान खेळाडू प्रकाश पादुकोण यांच्याकडून पुलेला यांनी ट्रेनिंग घेतली होती. त्यानंतर पुलेला यांनी पादुकोण यांच्यासारखीच कामगिरीही करून दाखवली. 2001मध्ये पुलेला यांनी चीनच्या चेन होंगवला पराभूत करून बॅडमिंटनमधील प्रतिष्ठीत टुर्नामेंट ऑल इंग्लंडचा पुरस्कार पटकावला होता. अशा प्रकारे पादुकोण नंतर हा पुरस्कार पटकावणारे ते भारताचे दुसरे खेळाडू ठरले. त्यानंतर कोणत्याच खेळाडूने आतापर्यंत हा पुरस्कार पटकावलेला नाही. यापूर्वी 1998मध्ये त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिंग्लसमधील ब्रॉन्झ पदकही जिंकलं होतं.
स्वत: कोर्टात नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर पुलेला यांनी अनेकांना घडवण्याचं काम केलं आहे. पुलेला गेल्या अनेक वर्षापासून भारताचे चीफ नॅशनल बॅडमिंटन कोच आहेत. तसेच हैदराबादमधील आपल्या अकादमीतून त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या देखरेखीखालीच सायना नेहवाल, पीव्ही सिंधु, किदांबी श्रीकांत, पी कश्यपसारखे खेळाडू देशाला भेटले. त्यांनी ऑलिम्पिक पासून ते वर्ल्ड चॅम्पियनशीपपर्यंत भारताचा नाव लौकिक वाढवला आहे. त्यामुळे बॅडमिंटनसहीत इतर कोणत्या खेळात भारताला नैपुण्या दाखवण्याची संधी आहे, याची माहिती पुलेला हे टीव्ही9 नेटवर्कच्या महाइव्हेंटमध्ये देणार आहेत.