मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना छोटसं दुखणं खूपच महागात पडताना दिसतं. त्यात काही लोक असे असतात जे छोटसं दुखणं म्हणून दुर्लक्ष करत असातात. पण नंतर तेच दुखणं त्यांच्यासाठी घातक ठरतं. तर असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा कान खूप दुखत होता. त्यामुळे ती घरीच कान साफ करून उपचार करत होती. जेव्हा डॉक्टारकडे गेली तेव्हा डॉक्टरलही हादरले.
चेशायरमध्ये लूसी नावाची एक 29 वर्षीय महिला राहते. ही महिला तीन मुलांची आई आहे. तर ऑक्टोबरमध्ये लूसीच्या कानात खूप दुखत होतं. तसंच एके दिवशी तिच्या कानातून तिला थोडा आवाजही येत होता. त्यामुळे तिला तिच्या कानात काहीतरी गडबड असल्याचं जानवलं होतं. पण तिला वाटलं की कानात मळ झाला असेल त्यामुळे तसं होत असेल. पण काही दिवसांनंतर कानदुखी खूपच वाढली त्यामुळे लूसी डॉक्टरकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी तिचा कान चेक केला असता तिच्या कानात कोळी असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
डॉक्टरांनी लूसीचा कान चेक केल्यानंतर समोर आलं की, तिच्या कानात फक्त कोळीच नव्हता तर त्या कोळीनं राहण्यासाठी तिच्या कानात जाळं बनवलं होतं. तसंच लूसीनं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिच्या कानात कोळी असेल. तिच्या कानातून कोळीला बाहेर काढताना तिला खूप त्रास झाला. तर कोळीला बाहेर काढताना लूसीला उलटी देखील झाली होती.
या धक्कादायक प्रकाराबाबत लूसीनं सांगितलं की, मी त्या कोळीला बाहेर काढण्यासाठी खूप तडफडत होते. आम्ही 111 आपत्कालीन नंबरवर कॉल केला आणि रूग्णालयात गेल्यानंतर माझ्या कानात गरम तेल टाकण्यात आलं आणि त्या कोळीला बाहेर काढण्यात आलं. त्या कोळीची उंची 1 सेंटीमीटर एवढी होती. तसंच लूसीच्या कानातून कोळीला बाहेर काढल्यानंतर तिच्या कानातून रक्तस्त्राव झाला, तसंच तिला नीट ऐकूही येत नव्हतं.