मुंबई: महाराष्ट्रात विविध गावचे बाजार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ठिकाणच्या बाजाराचं वेगळेपण असते. कोल्हापूरला कोल्हापुरी चप्पल, सोलापूरला चादर आणि जळगावला केळी, नाशिकला द्राक्षांचं मोठं मार्केट प्रसिद्ध आहे. तसंच भारतात एका ठिकाणी अनोखं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये सर्वकाही मिळतं. मात्र, त्याचं वेगळेपण हे आहे की त्यामध्ये चार हजार दुकानं आहेत. ही दुकानं पुरुष चालवत नाहीत. त्यामुळे ते आशिया खंडातील आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. 4 हजार दुकानांचं मार्केट महिलांद्वारे चालवलं जातं. (Woman Run Ima Keithal Market in Manipur famous for woman ownership)
मणिपूर राज्यातील या मार्केटमध्ये महिलांशिवाय इतर कोणीही दुकानं लावू शकत नाही. इथं फक्त महिला दुकान लावतात आणि त्याचं व्यवस्थापन पाहतात. आशियातील सर्वात मोठं महिलांद्वारे चालवलं जाणारं मार्केट म्हणून त्याकडे पाहिलं जाते. मणिपूरमध्ये या मार्केटला इमाकॅथिल मार्केट म्हटलं जातं किंवा मदर्स मार्केट देखील म्हटलं जाते. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये हे मार्केट भरते. इथ 4 हजार महिला व्यवसाय करतात.
इमाकॅथिल मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये सुरु झालेलं नसून त्याला मोठा इतिहास आहे. या मार्केटचं व्यवस्थापन महिलांकडून जवळपास 500 वर्षांपासून करण्यात येत आहे. मणिपूरमधील मैती समाजाचे पुरुष लढाईनिमित्त अनेक महिने घराबाहेर असायचे त्यावेळी महिलांनी घरासोबत मार्केटची जबाबदारी स्विकारली. तेव्हापासून इमाकॅथिल मार्केटमध्ये महिलांकडून दुकानं चालवली जातात. आता या मार्केटमधील दुकानांची संख्या वाढून 4 हजारांवर पोहोचली आहे. काही महिलांच्या अगोदरच्या पिढ्यांपासून इमाकॅथिल मार्केटमध्ये दुकानं चालवली जातात.
बाजारात काय मिळतं?
इमाकॅथिल मार्केटमध्ये दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तू, भाज्या, कपडे आणि इतर गोष्टी मिळथात. मणिपूरमधील पारंपारिक साहित्य 4 हजार दुकानांमध्ये मिळतं. इमाकॅथिलमध्ये दुकान चालवणाऱ्या महिलांची वार्षिक 75 ते 3 लाखांपर्यंत नफा मिळतो. ज्यावेळी दळणवळण आणि दूरसंचार तंत्रज्ञान विकसित झालं नव्हते त्यावेळी इमाकॅथिल मार्केटमध्ये परिसरातील बातम्या मिळायच्या, असं सांगितले जाते. याठिकाणी महिलांना जीवनात अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणारhttps://t.co/H6fUVUzGHZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
संबंधित बातम्या:
फळांचे दर पडले, संत्री, सफरचंद, अननस उत्पादकांची अडचण, ग्राहकांची चंगळ
डॉक्टरांचा देशव्यापी संप, कोणकोणत्या वैद्यकीय सेवा बंद?
(Woman Run Ima Keithal Market in Manipur famous for woman ownership)