आपला भारत विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक समाजात विविध रितिरिवाज आहेत. आता उत्तरेकडे श्रावण महिन्यातील काही चित्रविचित्र परंपरा आश्चर्यकारक आहेत. श्रावण महिन्यात हिंदू धर्मातील लोक अनेक जपतप करीत असतात. या महिन्यात सात्विक आहार घेतला जातो. अनेक चालीरिती मोठ्या विचित्र देखील आहेत. श्रावणात भारतातील एका गावातील महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत. या महिला असे का करतात यामागे कारण देखील थोडे विचित्र आहे. या गावातील पुरुषांना काही वेगळे नियम आहेत का ? पाहूयात…
हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटीतील गावात एक विचित्र प्रथा चालत आली आहे. पिनी नावाच्या गावात हजारो वर्षांपासून एक विचित्र परंपरा पाळली जात आहे. श्रावण महिन्यात पाच दिवस गावातील महिला कपडे घालत नाहीत. त्यामुळे या गावात पाच दिवसात बाहेरील लोकांना प्रवेश करण्यास बंदी असते.
महिला असे का वागतात…
हिमाचल प्रदेशातील या गावात इतिहास खुप जुना आहे. त्यामुळे येथील परंपरा अनोखी आहे. या गावातील महिला श्रावणाच्या पाच दिवस कपडे घालत नाहीत. कपडे न घालण्याची ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. या परंपरेमागे एक इतिहास आहे. या गावात कोणे काळी राक्षसांनी अगदी उच्छाद मांडला होता. त्यामुळे गावकऱ्यांचे जगणे हराम झाले होते. जेव्हा राक्षसांनी अगदी कहर सुरु केला. त्यावेळी अखेर ‘लाहुला घोंड’ नावाची एक देवता आली आणि तिने राक्षसांचा वध करुन गाववाल्यांना वाचविले. हे राक्षस जेव्हा गावात यायचे तेव्हा नटून थटून बसलेल्या महिलांना सर्वात आधी उचलून घेऊन जायचे. याच कारणांनी या गावात आजही महिला कपडे घालत नाहीत.
पिनी गावात आजही ही परंपरा पाळली जात आहे. परंतू ज्या महिला आपल्या इच्छेने ही परंपरा जोपसतात त्या श्रावणाच्या पाच दिवसात लोकरीने तयार केलेले एक वस्र अंगाभोवती गुंडाळतात. परंपरा पाळणाऱ्या या महिला पाच दिवस घराबाहेर येत नाहीत. या परंपरेला खास करुन विवाहीत महिला जोपासत आल्या आहेत.
या गावात महिलांनाच केवळ नियम नाहीत तर पुरुषांना देखील नियम आहेत. पुरुषांनी या काळात मद्य आणि मांस खाणे निषिद्ध आहे. या पाच दिवसात तर हे व्रत पालन करणे बंधनकारक असते. या पाच दिवसात पती-पत्नी एकमेकांकडे पाहून हसत देखील नाहीत. जर तुम्हाला पर्यटनाची इच्छा असेल तर गावात जाऊ शकता. परंतू या पाच दिवसात या गावात कोणालाही प्रवेश नसतो. गाववाले या पाच दिवसाच्या व्रताला मोठे पवित्र मानतात. आणि सणा सारखे हे दिवस साजरे करीत असतात. या गावात बाहेरच्या व्यक्तींना पाच दिवस प्रवेश नसतो….