जगातील या 10 शहरातील हवा सर्वात विषारी, दिल्लीचा पहिला क्रमांक मुंबईचा कितवा पाहा

| Updated on: Nov 06, 2023 | 2:47 PM

जगातील दहा सर्वाधिक प्रदुषित शहारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत देशातील तीन शहराचा समावेश झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. या यादीत राजधानी दिल्लीचा जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरात पहिला क्रमांक आला आहे. तर पहिल्या पाच शहरात भारतातील तीन शहरांचा प्रदुषित शहरांचा समावेश झाला आहे.

जगातील या 10 शहरातील हवा सर्वात विषारी, दिल्लीचा पहिला क्रमांक मुंबईचा कितवा पाहा
air pollution
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : भारतासह जगातील वेग-वेगळ्या शहरात प्रदुषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्यामुळे लोकांना श्वसनासह अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. राजधानी दिल्ली-एनसीआर सह देशातील अनेक शहरातील हवा कमालीची विषारी झाली आहे. यातच जगातील 10 सर्वाधिक प्रदुषित शहराची यादी जाहीर झाली आहे. या यादीत दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानातील लाहोर शहर आहे. टॉप 5 प्रदुषित शहरात तीन भारतीय शहरांचा समावेश आहे. मुंबईचा कितवा नंबर आला आहे ते पाहा…

जगातील 10 प्रदुषित शहराची यादी स्विस ग्रुप आयक्यूएअरने जारी केली आहे. हा ग्रुप वायू प्रदुषणावर आधारित एअर क्वालिटी इंडेक्स तयार करतो. या यादीप्रमाणे देशाची राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश टॉप टेन प्रदुषित शहरात समावेश झाला आहे. या यादीला तयार करण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी स. 7.30 वाजताच्या डाटाचा वापर केला आहे. त्यानंतर तीन दिवसानंतरही दिल्ली सह प्रमुख शहरातील हवेची गुणवत्तेचा दर्जा काही सुधारलेला नाही.

येथे पाहा ट्वीट –

जगातील 10 सर्वात प्रदुषित शहरे ?

या यादीनूसार 519 AQI मुळे दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या लाहोर ( AQI 283 ) शहराचा क्रमांक लागला आहे. 185 AQI सह कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर 173 AQI सह मुंबईचा क्रमांक लागला आहे. पाचव्या क्रमांकावर आखाती देश कुवैतची राजधानी ( AQI 165 ) कुवैत सिटी आहे.

इतर शहरांतील एअर क्वालीटी इंडेक्स पाहा

बांग्लादेशाची राजधानी ढाका ( AQI 159) सहावा क्रमांकावर आले आहे, मध्य पूर्वेतील आणखी एक देश इराकची राजधानी बगदाद सातव्या क्रमांकावर असून तेथील AQI 158 वर आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता 158 एक्यूआयसह आठव्या क्रमांकावर आहे. कतारची राजधानी दोहा 153 एक्यूआयमुळे नवव्या स्थानावर आहे. चीनचे वुहान हे शहर 153 एक्यूआयसह 10 व्या क्रमांकावर आहे. या शहरातील लोकांना श्वसनासह इतर त्रास होत आहेत.