जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे पीएम मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन, ग्रहस्थिती आणि बऱ्याच गोष्टींची मिळणार माहीती

| Updated on: Feb 29, 2024 | 5:10 PM

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय पंचांगावर आधारित विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे अनावरण होणार आहे. यावेळी अनेक योजनांचे व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान उद्धाटन करणार आहेत. या विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे वैशिष्ट्ये नेमके काय ?

जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे पीएम मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन, ग्रहस्थिती आणि बऱ्याच गोष्टींची मिळणार माहीती
ujjain vedic clock
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

उज्जैन | 29 फेब्रुवारी 2024 : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मार्च रोजी जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण होणार आहे. भारतीय पंचांगावर आधारित या वैदिक घड्याळाचे दूरदर्शी प्रणालीने उद्घाटन होणार आहे. हे जगातील पहिले वैदिक घड्याळ आहे. वेळेची गणना करण्याची भारतीय पद्धत सर्वात पुरातन, सुक्ष्म, शुद्ध, निर्दोष, प्रामाणिक आणि विश्वसनीय पद्धत आहे. या पद्धतीचे घड्याळ उज्जैन येथे पुनर्स्थापित करण्यात आले आहे.

जगभरात उज्जैन येथील निर्धारीत आणि प्रसारीत वेळेचे पालन हिंदु धर्मिय पंचागासाठी करीत असतात. भारतीय खगोलीय सिद्धांत आणि ग्रह नक्षत्रांच्या गती आधारावर भारतीय वेळेच्या गणनेत वेळेचा सर्वात सुक्ष्म अंश देखील सामील केला जात असतो. या घड्याळात संवत, महिना, ग्रहांची स्थिती, चंद्राची स्थिती, शुभ मुहुर्त, घटीका, नक्षत्र, सुर्य ग्रहण, चंद्रग्रहणाची स्थिती कळते. वैदिक घड्याळामुळे वेळेची गणना करण्याच्या प्राचीन भारतीय परंपरेला पुन्हा उजाळा देण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील जंतरमंतर येथे तब्बल 85 फूटाच्या टॉवरवर असलेल्या जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते होणार आहे. सरकारी जिवाजी ऑब्सर्व्हटोरीजवळ असलेल्या वैदिक घड्याळात हिंदु पंचागानुसार माहीती मिळणार आहे.

खालील माहीती मिळणार

ग्रहांची स्थिती

मुहुर्ताची माहीती

खगोलशास्रीय गणना आणि ज्योतिष

तिथी ( चंद्र दिवस )

असे काम करणार घड्याळ

हे वैदिक घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यानचा वेळ 30 भागांमध्ये विभाजित करेल, प्रत्येक तासात IST नुसार 48 मिनिटे असतील. कालगणना 0:00 वाजता सूर्योदयापासून सुरू होईल, प्रत्येक 30 तासांच्या चक्राची सुरूवात होईल असे शिशिर गुप्ता यांनी सांगितले. उज्जैन शहराची भौगोलिक स्थिती कर्कवृत्तातून येत असल्याने योग्य वेळ समजण्यासाठी हे शहर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. तीनशे वर्षांपूर्वी उज्जैन येथे कालगणना मशिन देखील होती.