Year Ender 2024 : कब्रस्तानापासून ट्रेनमध्ये बलात्कार आणि हत्या; ‘या’ सायकोकिलर्सची कहाणी वाचून अंगाचा थरकाप होईल

| Updated on: Jan 02, 2025 | 5:00 PM

2024 हे वर्ष भारतात अनेक भयानक सायको किलिंगच्या घटनांनी हादरले. गोवा, उत्तर प्रदेश, बरेली, कोलकाता आणि कर्नाटकमधील क्रूर हत्याकांडांनी जनमानसाला हादरवलं. यातील काही गुन्हेगारांनी महिलांना विशेष लक्ष्य केलं, तर काहींनी वैयक्तिक वादातून हत्या केल्या. या घटनांमधील सायको किलर्सची मनोस्थिती आणि त्यांच्या गुन्ह्यांचा तपशील या लेखात आहे.

Year Ender 2024 : कब्रस्तानापासून ट्रेनमध्ये बलात्कार आणि हत्या; या सायकोकिलर्सची कहाणी वाचून अंगाचा थरकाप होईल
क्राईम न्यूज
Follow us on

Year Ender 2024 : जगात असंख्य प्रकारची माणसं असतात. काही माणसं साक्षात देवासारखी असतात. त्यांच्या सहवासात कायम राहावसं वाटतं. ही लोक समाजाला सुधारतात. समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जातात. तर काही माणसं जनावरासारखी असतात. नराधम शब्द कमी पडेल इतकी विकृत आणि अत्यंत वाईट असतात. त्यांना बघितल्यावर अंगाचा थरकाप होतो. अशाच काही लोकांनी 2024मध्ये अंगाचा थरकाप उडवला. सायको किलिंग करून या लोकांनी भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरवलं. कोण आहेत हे सायको किलर? त्यांची कहाणी काय आहे? याचा आज आपण आढावा घेणार आहोत.

गोव्यापासून ते कर्नाटकपर्यंत अनेक गुन्हेगारांनी अत्यंत क्रूर गुन्हे केले आहेत. त्यांनी अनेकांची हत्या घडवून आणली. त्यात महिलांना अधिक टार्गेट केलं गेलं. एकट्या महिलेला गाठून तिची हत्या करण्यात आली. काहींनी विवाहबाह्य संबंधातून हत्या केली. तर काहींनी आपल्या पेशाच्या आड येऊन महिलांची हत्या केली. काहींनी तर इतर राज्यांमध्ये जाऊनही हत्या केली. एकाने तर विवाह्यबाह्य संबंधातून प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर आपल्या राज्यात येऊन स्वत: आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात अत्यंत धक्कादायक माहिती दिली होती. अनेकांच्या सुसाईड नोटही समोर आल्या, यात काय लिहिलं होतं?

गोव्यातील हॉटेलात काय घडलं?

पहिली केस गोव्यातील आहे. माइंडफूल एआय लॅबचे फाऊंडर आणि सीईओ सूचना सेठने तिच्या चार वर्षाच्या लहान मुलाची हत्या केली. आधी ती मुलाला फिरायला घेऊन गेली. ती बंगळुरूवरून गोव्याला आली. त्यानंतर 6 जानेवारीच्या रात्री तिने मुलाची हॉटेलात हत्या केली. त्यानंतर डेडबॉडी सुटकेसमध्ये भरली आणि कॅब बुक करून परत बंगळुरूला जायला निघाली. तिला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. पण तिचा भांडाफोड झाला. ती पकडली गेली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिची घटस्फोटाची केस कोर्टात सुरू असल्याचं उघड झालं होतं.

बाप मुलाला आठवड्यातून एकदा भेटू शकतो, असे आदेश कोर्टाने दिले होते. कोर्टाचे हे आदेश तिला काही पटले नव्हते. त्यामुळे तिने मुलाचाच काटा काढला. आपला मुलगा नवऱ्याकडे कधीच जाऊ नये असं तिला वाटत होतं. सध्या सूचना सेठ तुरुंगात आहे.

कब्रस्तानातच हत्या

दुसरं प्रकरण हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील आहे. या शहरातून पोलिसांनी जूनमध्ये एका सायकोकिलरला अटक केली. तो स्वत:ला संजय दत्तचा फॅन असल्याचं सांगायचा. त्याचं नाव अदनान ऊर्फ बल्लू होतं. बल्लू विवाहित होता. तरीही तो एका महिलेच्या प्रेमात पडला होता. ती महिलाही विवाहित होती. दोघांचंही अफेयर सुरू होतं. मात्र, आपली प्रेमिका इतरांसोबतही बोलत असल्याचं त्याला समजलं. प्रेयसीचं दुसरीकडे अफेयर सुरू असल्याचा त्याला संशय आला. त्यामुळे तो संतापला. आपली गर्लफ्रेंड आपल्याला धोका देत असल्याची त्याला वाटलं. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडला कब्रस्तानात भेटायला बोलावलं. आणि तिथेच तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी तो सतत बडबड होता. मी संजय दत्तचा मोठा फॅन आहे. मला फसवणूक केलेली आवडत नाही, असं तो म्हणत असायचा. सध्या बल्लू तुरुंगात आहे.

रेप, खून आणि पुरावा म्हणून दागिना…

उत्तर प्रदेशातील बरेलीतील ही तिसरी घटना आहे. एका सीरिअल किलरला पोलिसांनी पकडले. त्याने जी धक्कादायक माहिती दिली, त्यामुळे सर्वच हादरले. त्याने एक दोन नव्हे तब्बल 11 महिलांची हत्या केली होती. तो महिलांवर बलात्काराचा प्रयत्न करायचा आणि नंतर त्यांचा गळा दाबून खून करायचा आणि पुरावा म्हणून त्या महिलेचा एखादा दागिना घेऊन जायचा. आरोपीचं नाव कुलदीप गंगवार आहे. तो बरेलीच्या नवाबगंज पोलीस ठाणे परिसरातील बाकरगंज समुआ येथील रहिवासी आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. कुलदीपचं लग्न भानपूर गावातील लौंगश्रीशी झालं होतं. पण लौंगश्रीने दुसरं लग्न केलं. त्यानंतर तो महिलांचा द्वेष करायला लागला.

महिला डॉक्टरची हत्या

पश्चिम बंगालच्या कोलकात्यातही अशीच धक्कादायक घटना घडली. कोलकाता पोलिसांनी 10 ऑगस्ट रोजी संजय रॉय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. त्याने अटकेच्या एक दिवस आधी आरजी कर रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरवर रेप केला. त्यानंतर तिला क्रूरपणे मारून टाकलं. संजय पोलिसांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. त्याचे पाच लग्न झाले होते. पण एकही लग्न टिकलं नव्हतं. त्याने सर्व बायकांना टॉर्चर केल्याने त्यांनी घटस्फोट घेतल्याचं सांगितलं जातं. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. सध्या खून प्रकरणात तो तुरुंगात आहे. या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे.

हत्या करून बॉडी फ्रिजमध्ये

कर्नाटकातील बंगळुरूही 2 सप्टेंबर रोजी हादरून गेलं. महालक्ष्मी नावाच्या महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. महालक्ष्मी विवाहित होती. तिला एक मुलगी होती. पण ती नवऱ्यापासून वेगळी राहत होती. महालक्ष्मीचा नंतर एका मुलाच्या प्रेमात पडली. रंजन रॉय असं त्याचं नाव होते. तो ओडिशाचा राहणारा होता. रंजन रॉयनेच महालक्ष्मीची हत्या केली होती. त्याने तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले आणि फरार झाला होता. काही दिवसानंतर फ्लॅटमधून घाणेरडा वास यायला लागला. त्यानंतर या हत्याकांडाचा खुलासा झाला. पोलिसांनी रंजन रॉयला अटक करण्यासाठी ओडिशाला गेले होते. तेव्हा त्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं. त्याने एक सुसाईड नोट सोडली होती. त्यात त्याने धक्कादायक खुलासा केला होता. महालक्ष्मी मला टॉर्चर करत होती. मी ते सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे तिला मारून टाकलं, असं रंजनने सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

चालत्या ट्रेनमध्ये हत्या आणि बलात्कार

गुजरात पोलिसांनी एका सायको किलरला पकडलं. हा सायको किलर म्हणजे महाभयंकर होता. अत्यंत नीच माणूस होता. त्याने क्रूरतेचा कळस गाठला होता. या नराधमाने तरुणांपासून वृद्धांपर्यंत कुणालाच सोडलं नाही. एका मुलीची हत्या केली. त्यानंतर अनेक तास तिच्यावर बलात्कार करत होता. आरोपीने जेव्हा पोलिसांकडे सर्व आरोप कबूल केले. तेव्हा सर्वच हैराण झाले. धक्कादायक म्हणजे, त्याने एकाच राज्यात गुन्हे केले नाही तर पाच राज्यात गुन्हे केले. राहुल सिंह जाट (वय 29) असं या आरोपीचं नाव होतं. तो हरियाणाच्या रोहतक इथला राहणारा आहे. तो दिव्यांग आहे. त्याने गुजरातमधील एका 19 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून तिची हत्या केली. याच गुन्ह्यात त्याला अटक झाली. त्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात ट्रेनमध्ये हत्या केली. एका ट्रेनमध्ये बलात्कार केला. अटकेच्या एक दिवस आधीच त्याने तेलंगणात एका महिलेची हत्या केली होती. साधारण 11 दिवसात त्याने एकूण पाच हत्या केल्या. सध्या तो तुरुंगात आहे.