तुम्हीपण नेकबँड घालत असाल तर सावधान, त्या तरूणासोबत काय घडलं ?

| Updated on: Feb 06, 2025 | 8:23 AM

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये नेकबँडच्या स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली. इंदिरा नगर येथील सेक्टर 17 मध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तरूणाचा गळ्यातील नेकबँडच्या स्फोटामुळे मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा आशिष कानात नेकबँडच्या घालून, त्याद्वारे बोलत होता.

तुम्हीपण नेकबँड घालत असाल तर सावधान, त्या तरूणासोबत काय घडलं ?
नेकबँडमुळे तरूणाने गमावला जीव
Follow us on

आजकाल अनेक जण कानात हेडफोन्स, नेकबँड घालून बोलत असतात. मात्र त्यामुळे अनेकवेळा दुर्घटना घडत असतात. असाच एक दुर्दैवी प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडला. तेथे नेकबँड हाच एका तरुणाच्या मृत्यूचे कारण बनले. खरंतर, हा तरुण नेकबँड घालून फोनवर बोलत असताना स्फोट झाला. आणि त्या स्फोटामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,हा तरुण गळ्यात नेकबँड घालून बोलत होता पण अचानक तो पडला. लोकांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यावर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

साधारणपणे, आता बहुतेक लोक फोनवर बोलण्यासाठी ब्लूटूथ नेकबँड आणि इअरबड्स वापरण्यास सुरुवात करतात. बहुतेक लोकांच्या कानात तुम्हाला हे डिव्हाईस सहज दिसतील. गेल्या काही वर्षांत इअरफोन्सचा ट्रेंडही खूप वाढला आहे. आता लोकांनी वायर्ड इअरफोन्सऐवजी पोर्टेबल इअरफोन वापरण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांत अडकणाऱ्या त्या तारांऐवजी अनेक लोक ते चार्जिंगवाले इअरफोन किंवा इअरबड वापरणे पसंत करतात. हे इअरफोन वापरण्यास अतिशय सोपे आहेत पण गेल्या काही दिवसांत काही मोठ्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये घडली. तेथे राहणाऱ्या 27 वर्षांच्या आशिष या तरूणाचा अचानक मृत्यू झाला. नेकबँडमध्ये स्फोट झाल्याने आशिषला जीव गमवावा लागला.

नेकबँडमुळे गमावला जीव

लखनऊमध्ये नेकबँडच्या स्फोटामुळे एक मोठी दुर्घटना घडली. आशिष हा 27 वर्षांचा तरूण सेक्टर 17, इंदिरा नगर येथे रहात होता. इतर तरूणांप्रमाणेच त्यालाही नेकबँड गळ्यात घालायची सवय होती. मात्र तोच त्याच्या जीवावर बेतला. त्याच्या नेकबँडमध्ये अचानक स्फोट होऊन आशिषचा मृत्यू झाला. हा स्फोट झाला तेव्हा आशिष हा त्याच नेकबँडच्या माध्यमातून कोणाशी तरी फोनवरून बोलत होता.

शेजाऱ्यांनी दिली माहिती

आशिषचे नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास आशिष गच्चीवर गळ्यात नेकबँड घालून बराच वेळ कोणासोबत तरी बोलत होता. तर दुसरीकडे त्याची आई आणि बहीण त्याला शोधत होते. मात्र, त्याचवेळी आशिष हा गच्चीवर पडलेला दिसला. त्याच्या शरीराचा बराच भाग जळाला होता. त्याच्या छाती, पोट व उजव्या पायाची कातडी फाटलेली होती. तर गळ्यात घातलेला ब्लूटूथ नेकबँड वितळत होता आणि खाली लटकत होता. हे पाहताच आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्याला तात्काळ राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नेकबँडचा स्फोट झाल्याच्या बातमीने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.