हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात युटूबर नमरा कादिरच्या अडचणीत वाढ, चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

| Updated on: Dec 08, 2022 | 4:58 PM

युट्युबर नमरा कादिर हिच्या विरोधात हनी ट्रॅप आणि ब्लँकमेलिंगचा आरोप करण्यात आलेला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात युटूबर नमरा कादिरच्या अडचणीत वाढ, चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे
नमरा कादिर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  नमरा कादिर (Namra Qadir) ही सोशल मीडियावर विशेषतः युट्युबवरचा प्रसिद्ध चेहरा आहे. नमरा ही दिल्लीची युट्यूबर आहे, जी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या व्हिडीओ आणि फोटोंवर कमेंट्सचा पाऊस सुरू असतो पण आता ही नामरा तिच्याच जाळ्यातअडकली आहे. गुरुग्राममध्ये एका व्यावसायिकाने नामरा आणि तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की दोघांनी त्याला हनीटॅपमध्ये अडकवले, त्याचे आक्षेपार्ह फोटो काढले, व्हिडिओ बनवले आणि ब्लॅकमेल करून 80 लाख रुपये वसूल केले. तर नमराने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

YouTuber वर हनीट्रॅपचा आरोप

नमरा कादिरचे यूट्यूबवर 6 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सध्या ती गुरुग्राम पोलीस ठाण्याच्या तुरुंगात आहे. यू-ट्यूबर नामरा कादिरच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘यू टर्न’ आला आहे. एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपिंग केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याला दारू पाजून त्याचे पक्षेपाहार्य फोटो काढण्यात आले आणि नंतर त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देण्यात आली. यावर आरोपी नामरा कादरी हिने आपली भूमिका मांडली आहे.

हे सुद्धा वाचा

नमरा कादरीचे काय म्हणणे आहे

नमराने सोशल मीडियावर या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. नमराने यूट्यूब चॅनलवर सांगितले की,  दिनेश यादव नामक व्यापाऱ्याने तिला इतकी रक्कम दिलेली नाही तसेच जे पैसे त्याने मला दिले ते माझ्या कामाचे असल्याचे ती म्हणाली.