गृहितक काय असतं? एखाद्या घटनाक्रमाचं मर्यादित पुराव्यांवर आधारित केलेलं आणि पुढे जाऊन विस्तृत तपासावं लागतं असं सुरुवातीचं विश्लेषण म्हणजे गृहितक. एखादा मुद्दा लगेच सिद्ध होणारा नसला तरी चौकशी किंवा तपासणीसाठी सुरुवातीच्या काळात वापरणारं साधन म्हणूनही संशोधकांकडून गृहितक वापरलं जातं. कोविड 19 हे सर्वात मोठं कथिक नैसर्गिक संकट असलं तरी संशोधक आणि साथीरोगतज्ज्ञांसाठी या विषाणूचा उगम आणि त्याचं स्वरुप अजूनही कोडच आहे. दरम्यान, जगात लाखो लोकांचे मृत्यू झालेत, बेरोजगार झालेत, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यात आणि मानव जातीने दुर्मिळपणे अनुभवलेली एक प्रकारची अनिश्चितता तयार झालीय.
अजूनही सार्स कोविड 2 (SARS-CoV-2) च्या वर्तनाचं स्वरुप शोधण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. हा विषाणू कसा आला, का आला आणि कधी कसा दूर जातो हे आतापर्यंत कुणालाही माहिती नाही. जर कोरोना विषाणूचा संसर्ग ही नैसर्गिक गोष्ट असती आणि त्याचं काही अनिश्चित असं वर्तन असतं असतं तर जगातील नावाजलेल्या शास्त्रज्ञांनी आणि जाणकारांनी त्याच्या अनिश्चिततेचाही पॅटर्न शोधण्याची पद्धत शोधली असती. मात्र, वास्तवात तसं झालेलं नाही. जगभरातील शास्त्रज्ञांना या विषाणूचा तसा पॅटर्न शोधण्यात अपयश आलंय.
असं घडत असल्यानंच या विषाणू संसर्गामागे मोठं षडयंत्र किंवा मानवी बुद्धी आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. हाच प्रश्न पुढे कोरोना विषाणूबाबतच्या गृहितकाला बळ देतो. मग हा विषाणू एखाद्या प्रयोगशाळेतून गळती झाल्यानं पसरला आणि नंतर त्याचा वापर मोठ्या स्तरावर झाला का असा प्रश्नही उपस्थित होतो.
भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सर्वोच्च संसर्गाच्या परिस्थितीत 16 सप्टेंबर 2020 रोजी दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या 98,000 पर्यंत पोहचली होती. मात्र, त्यानंतर हा रुग्णसंख्या कमालीच्या तीव्रतेने कमी झाली. असं होण्यामागे कोणतंही स्पष्टीकरण अस्तित्वात नाही. व्यवस्थित आठवलं तर कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने कमी होत असताना लॉकडाऊनही नसल्याचं लक्षात येईल. पहिल्या लाटेत रुग्णसंख्येत इतकी तीव्र घट होण्याचं कारण समजलं तर ते भीती तयार करणाऱ्या दुसऱ्या लाटेला आणि संभावित तिसऱ्या लाटेलाही लावता येईल.
विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येतील ही घट आजूबाजूला सणांचा काळ असताना आणि निवडणूक काळात झाली. या काळात शेकडो, हजारो लोक अनेक तास दुर्गा पुजेला (22-26 ऑक्टोबर) एकत्र येत होते, बिहार विधानसभा निवडणूक (25 सप्टेंबरला घोषणा, 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर 3 टप्प्यात मतदान), दिवाळी (14 नोव्हेंबर), पुढे येणारा ख्रिसमस (25 डिसेंबर) असं सगळं होतं. हे सगळं होतानाही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली.
रुग्णसंख्या कमी होण्याच्या याच पॅटर्नची दुसऱ्या लाटेतही पुनरावृत्ती झाली. दुसऱ्या लाटेत 6 मे 2021 रोजी दररोज 4.14 लाख रुग्णांना कोरोना संसर्ग होत होता. याला एखादा व्यक्ती लॉकडाऊन लागू असल्याचं कारण सांगू शकेल. पण मग पहिल्या कोरोना लाटेत लॉकडाऊन नसतानाही कमी झालेली रुग्णसंख्येला काय स्पष्टीकरण आहे? इथं नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीची मांडणी (Herd immunity theory) लागू होत नाही. कारण यासाठी एकूण लोकसंख्येच्या 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना संसर्ग व्हावा लागतो. असं झालं आहे असं मानलं तरी त्यामुळे रुग्णसंख्येत इतक्या वेगाने घट होऊ शकत नाही.
इथंच मी लेखाच्या सुरुवातीचं गृहितक मांडण्याची हिंमत करतो आहे.
माझ्या मर्यादित, अनौपचारिक संशोधनावरुन मला हे दिसलंय की दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती जरी बाधित झाला तरी संपूर्ण कुटुंब बाधित व्हायचं. मात्र, मे महिन्याच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली तेव्हा संसर्गाचा हा पॅटर्न बदलला. त्या काळात कुटुंबातील एखादा व्यक्ती बाधित झाला तरी संपूर्ण कुटुंब बाधित होईल अशी स्थिती राहिली नाही.
याचं स्पष्टिकरण कोरोना विषाणूची संसर्ग क्षमता घटत असल्याचं गृहितक देऊ शकते. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होताना आणि दुसऱ्या व्यक्तीकडून पुढे तिसऱ्या व्यक्तीला संसर्ग होताना विषाणूची संसर्ग क्षमता घटत होती. त्यामुळेच जवळपास चौथ्या टप्प्यावर विषाणू त्याची संसर्ग क्षमता गमावत असावा. म्हणूनच विषाणू पहिल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला आणि दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीला बाधित करताना आपली संसर्ग क्षमता गमावतो असं गृहितक मांडता येतं. जर मोठ्या प्रमाणात माहिती संकलित केली तर हे गृहितक खरं ठरेल असं मला वाटतं. कारण आकडेवारी खोटं बोलत नाही.
यानंतर या गृहितकात तथ्य आढळलं तर दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक होत असलेली घट ही एकाकडून दुसऱ्याकडे संसर्ग होताना विषाणूची क्षमता कमी झाल्यानंच होत असल्याचं निसंशय स्पष्ट होईल. तसेच काही टप्प्यानंतर या विषाणूचा संसर्ग होणं थांबतं हेही समोर येईल. आता जर हे गृहितक बरोबर निघालं आणि एक विषाणू अधिकाधिक किती लोकांना संसर्ग करु शकतो याच्या सूत्राकडे (R-naught math) लक्ष दिलं तर कोविड 19 नैसर्गिक संकटाच्याही पलिकडे काही तरी असल्याचं दिसेल. यानंतर तुम्हालाही जैविक हल्ल्याची शक्यता वाटेल.
एखादा विषाणू किती व्यक्तिंना बाधित करु शकतो याची संख्या दर्शवणारी गणितीय संकल्पना म्हणजे R-naught. संशोधकांनी कोरोना विषाणूसाठी R-naught ची संख्या 5 असल्याचा अंदाज वर्तवलाय. याचा अर्थ एक कोरोना बाधित रुग्ण आणखी 5 लोकांना बाधित करु शकतो. प्राथमिक स्तरावरील हे 5 रुग्ण दुसऱ्या टप्प्यावर आणखी 25 लोकांना बाधित करु शकतात. यानंतरही विषाणू संसर्ग करु शकतो असं मानलं तरी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यापर्यंत हा विषाणू जास्तीत जास्त 625 जणांना बाधित करेल. यातील 600 लोक तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील असतील.
आता इथं प्रश्न उपस्थित होतो की कोरोनाच लाट अचानक खाली येण्याआधी 1 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग कसा होतो? जर विषाणू चौथ्या व्यक्तीला बाधित केल्यानंतर संसर्ग क्षमता गमावत असेल तर मग दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांना बाधा होण्यासाठी पहिल्या टप्प्यावर कमीत कमी 1 लाख लोकांना संसर्ग झालेला असला पाहिजे. असं झालं तरच R naught 5 प्रमाणे चौथ्या स्तरापर्यंत विषाणू 1 कोटी लोकांना बाधित करुन आपली संसर्ग क्षमता गमावेल. म्हणूनच सुरुवातीला 1 लाख लोकांना प्राथमिक स्तरावर संसर्ग झाल्याशिवाय हा विषाणू R-naught 5 प्रमाणे इतका पसरू शकत नाही.
परदेशातून केवळ काही लोक बाधित होऊन भारतात आल्यानं इतक्या मोठ्या स्तरावरील संसर्ग होऊ शकत नाही. यासाठी प्राथमिक स्तरावर अनेक विमानं भरुन 1 लाख कोरोना बाधित व्यक्ती देशात यावे लागतील. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी आणि देशांतर्गत विमानसेवेवरील निर्बंध पाहता ही शक्यता निकालात निघते.
इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग होण्यासाठी कोरोना विषाणूंनी भरलेल्या मोठ्या प्रमाणातील वस्तू भारतात आल्या का? पहिल्या कोरोना लाटेत इटलीत कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली. तेव्हा त्याचा संबंध इटलीतील फॅशन इंडस्ट्रीने चीनमधील वुहानमधून आयात केलेल्या चामड्याशी होता. येथेच कोरोना विषाणूचा उगम सापडतो. इटलीच नाही तर जगात इतरही असे देश आहेत जेथे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली.
विषाणूने जनुकीय बदल करुन नवे विषाणू तयार होण्यास आणि त्यातून संसर्ग होण्यास खूप वेळ लागतो, ते एका रात्रीत होत नाही.जर R-naught गृहितकाप्रमाणे कोरोना विषाणू प्रत्येक टप्प्यावर आपली संसर्ग क्षमता गमावत असेल, तर मग कोरोनाच्या लाटा नैसर्गिक नाहीत. हे एका मोठ्या विचार करण्यापलिकडील षडयंत्राकडे बोट दाखवते. म्हणजेच हे एका सुनियोजित जैविक हल्ल्याचं लक्षण आहे. जर हे गृहितक खरं ठरलं नाही तर मग दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत अचानकपणे होणाऱ्या घटनेमागील कारण कुणालाही न समजणारं आहे.
आता या गृहितकात काही तथ्य आहे की नाही हे सर्व माहिती संशोधक, सरकार, साथीरोगतज्ज्ञ आणि जाणकारांचं काम आहे. या जाणकारांना काही महिने आधीच्या आकडेवारीपर्यंत जावं लागेल. त्यांना महाराष्ट्रात आणि केरळमध्ये दुसरी कोरोना लाट आली तेव्हा काय घडलं हे शोधावं लागेल. या काळात कोठून प्रवासी आणि विमानं आली? या काळात आलेल्या आयात माल मूळचा कोठला होता? प्रत्येक गोष्ट तपासावी लागेल. तरच भारत आणि जग कोरोना विषाणूचं कोडं सोडवू शकेल.
दुर्दैवाने तज्ज्ञ आणि सरकार हेच करत नाहीये. दुसरीकडे याच काळात काही पंडित तिसऱ्या लाटेचं भाकित करत आहेत. जणूकाही खरंच तिसरी लाट येत आहे. म्हणूनच जेव्हा आपल्याकडे ही गोष्ट येते तेव्हा आपण त्याचा स्रोत आणि कारण उलगडण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्याला या विषाणूबाबत इतकी कमी माहिती असतानाही आपण तिसरी लाट येत आहे असं कसं म्हणू शकतो? असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा कुठंतरी कुणीतरी याचं आधीच नियोजन करुन ठेवलंय.
(लेखक बरुण दास हे टीव्ही 9 नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआयटी चेन्नई आणि आयआयएम कोलकाताचे माजी विद्यार्थी आहेत.)