मुंबईः लंडनमध्ये जेव्हा ‘आंबेडकर इंटरनॅशनल मिशन’ (Ambedkar International Mission) व ‘डॉ.आंबेडकर जन्मशताब्दी समिती’ या संस्थांच्या स्मरणिकासाठी जेव्हा भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन (British Viceroy Lord Mountbatten) यांनी 26 मार्च 1968 व 14 एप्रिल 1973 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आठवणी लिहून दिल्या त्या आठवणीत ते बाबासाहेबांबद्दल लिहितात की, माझी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr, Babasaheb Ambedkar) यांची पहिली भेट झाली ती आजही माझ्या मनात तशीच स्मरते. ते म्हणतात की, दक्षिण-पूर्व आशियाचा सुप्रिम अलाईड कमांडर म्हणून 1943 रोजी माझी नेमणूक झाली तेव्हा माझ्या कामाचे ठिकाण होते ते दिल्ली.
त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्हाईसरॉयच्या कौन्सिलचे ते मजूर सदस्य म्हणून त्यांची त्यांची नेमणूक झाली होती. त्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि समभाव यासाठीच लढत होते. समकालीन सहकार्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे संपादन आणि लेखन करणारे विजय सुरवाडे यांच्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी सांगण्यात आल्या आहे.
युद्ध काळावर बोलताना ते म्हणायचे नाझी आणि फॅसिस्ट यांनी जर युद्ध जिंकले तर समता, स्वातंत्र्य आणि समभावयुक्त समाज कधीच निर्मित होणार नाही. त्याकाळात काळाचा किती तरी भविष्याचा विचार करुन आणि भविष्य जाणून होते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय कामगार या दोघांनीही दुसरे महायुद्ध सुरु ठेवण्यासाठी सक्रिय सहकार्य करत राहिले.
ब्रह्मदेशात ज्यावेळी युद्ध सुरु झाले त्यावेळी भारतीय सैनिकांकरवी युद्धात ब्रह्मदेशात सक्रिय झाला, त्या युद्धामुळेच डॉ. आंबेडकर यांच्या पाठिंबा मागण्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती. ज्यावेळी त्यांनी माझ्या सहकार्यासाठी माझ्या पाठिमागे उभा राहिले तेव्हा त्यांचा त्या काळातील मला खूप मोठा आधार होता असं त्या आपल्या आठवणीत सांगतात.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर यांची जेव्हा नेमणूक करण्यात आली, तेव्हा 1947 मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांना स्वंतत्र भारताच्या पहिल्या मंत्री मंडळात त्यांची विधी मंत्री म्हणून नेमणूक व्हावी तेव्हा माझे आणि जवाहरलाल नेहरू यांच्या प्रस्तावाला जनरल लॉर्ड माउंट माऊंट बॅटन यांनी प्रस्तावाला जोरदार पुष्टी दिली होती असं ते समकालीन घटनेविषयी नमूद करतात.
माउंट बॅटन आपल्या त्या आठवणीत सांगतात की, भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेमणुकीला सहमती देताना त्यांना पाहून मला केवढा तरी आनंद झाला होता. माझा आनंद तो वैयक्तिक नव्हता, तर भारतीय संविधान समितीमध्ये भारताच्या नव्या संविधानाची त्यांनी अत्यंत कार्यक्षमरित्या निर्मिती करत असताना त्यांना कौतुकानेच पाहिले असल्याचे पुस्तकात सांगितले आहे.
भारतातील अठरा पगड जातींसाठी अस्पृश्य, अनुसुचित समाजातील दुःख, दैन्य वाहून नेण्याचे काम कुणी केले असेल तर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी. ब्रिटिश सत्येचे ज्यावेळी हस्तांतरण झाले त्यावेळी अस्पृश्य समाजातील 60 लाख माणसं ही दलित होती, म्हणजेट ब्रिटिश बेटाच्या लोकसंख्येपेक्षाही कितीतरी पटीने अधिक होती. या एवढ्या लाखो समुहाच्या नेत्याला अस्पृश्य जनता बाबासाहेब म्हणत हे ही त्यांनी आपल्या आठवणीत सांगितले आहे.
बाबासाहेबांविषयी लिहिताना लॉर्ड माउंट बॅटन म्हणतात,दलित असणं, अस्पृश्यतेचे चटके सहन करणे ही सगळी दुःखं बाबासाहेब यांनी भोगली होती. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर भारतातील त्यांच्या असंख्य विरोधकांविरुद्ध एकटे उभा राहिले आणि एकटे स्वतःच्या जीवावर लोकशाही मार्गाने रक्तरंजित क्रांति न करता लढत राहिले.
भारताच्या इतिहासातील अजरामर झालेल्या पुणे कराराविषयी लॉर्ड माउंट बॅटन लिहितात,महात्मा गांधींच्या पुणे करारात दिल्या गेलेल्या अस्पृश्यांच्या विधिमंडळातील प्रतिनिधीत्वासंबंधीच्या उपाय योजनेविरुद्ध त्यांनी अगदी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले गेले तर अस्पृश्यांना काँग्रेस पक्षाच्या दावणीस बांधले जाणार आहे. त्या करारावरुन साऱ्या जगाला कळले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मोठे धैर्य होते. म्हणून भारतासारख्या देशात, त्या वातावरणात त्यांचेसारखे ठामपणे उभा राहणे म्हणजे प्रचंड मोठ्या धैर्याची गरज होती ती. म्हणूनच ज्याचा भारताच्या इतिहासात अजरामर ठसा उमटलेला आहे अशा स्वच्छ दृष्टीच्या या लढवय्याला जाणून घेणे म्हणजे एक आल्हाददायक अनुभव होता असेच ते म्हणतात.
(या लेखासाठी विजय सुरवाडे यांनी संपादन केलेल्या समकालीन सहकार्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचा आधार घेतला आहे.)
संबंधित बातम्या
ज्योतिबा फुलेः 19 व्या शतकात रुढी परंपराविरुद्ध आवाज उठविणारा पहिला महात्मा