तरुण जोडप्यांनी त्यांचे आर्थिक नियोज कशा पद्धतीने करावे?

| Updated on: Aug 26, 2019 | 1:36 PM

परिणामकारक नियोजन हे कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी करावी लागते. नियोजन हे कोणत्याही परीक्षेसाठी, नोकरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या कुटुंबातील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरते.

तरुण जोडप्यांनी त्यांचे आर्थिक नियोज कशा पद्धतीने करावे?
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
Follow us on

परिणामकारक नियोजन हे कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी करावी लागते. नियोजन हे कोणत्याही परीक्षेसाठी, नोकरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या कुटुंबातील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरते. नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक आणि वर्तनात्मक बाबींचा सावध विचार आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्ती काही प्रकारच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नियोजन करते.

लग्नानंतर, अगदी तरुण जोडप्यानेही विविध पैलूंमध्ये काळजीपूर्वक नियोजन करण्याची गरज आहे. तरुण विवाहित जोडप्याने घ्यावयाचा एक बुद्धिमान निर्णय म्हणजे त्यांच्या आर्थिक योजना आखणे. जीवनाचा नवीन प्रवास करत असताना त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या मुलांना यशाची शिडी चढण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या आर्थिक बाबतीत चांगली योजना बनविणे अत्यंत महत्वाचे असते. प्रभावी आर्थिक नियोजनासाठी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्या पुढील प्रमाणे.

1) आपल्या स्वतःला भविष्यात कुठे पाहायचे आहे? :

प्रत्येक तरुण जोडप्याने त्यांचे भविष्य आत्तापासूनच 5 ते 10 वर्षानंतरचे काय असेल आणि त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची कल्पना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी स्वतःला काही विशिष्ट बाबींवर प्रश्न विचारले पाहिजेत. आम्ही आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर खूश आहोत का? आतापासून 5-10 वर्षात आपण स्वतःला कुठे पाहतो? त्या पातळीवर पोहोचण्यासाठी आपण काय केले पाहिजे? त्या पातळीपर्यंत पोहोचण्यात आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात? याचा विचार करायला हवा.

2) रोख पैशाची आवक आणि जावक याचे निरीक्षण करा :

प्रभावी आर्थिक नियोजनापासून सुरुवात करण्यासाठी तरुण जोडप्याने त्यांच्या मासिक/वार्षिक रोख प्रवाहाचे निरीक्षण करावे. यामुळे सद्य आर्थिक परिस्थिती संदर्भात अंदाज बांधण्यास मदत होईल व यावर पुढील नियोजन ठरविता येईल.

3) विमा योजना :

प्रत्येक विवाहासाठी विविध विमा पॉलिसींमध्ये गुंतवणूकीसाठी आणि स्वतःच्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही प्रमाणात पैशांची बचत करणे प्रत्येक तरुण जोडप्यासाठी हे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. म्हणूनच, तरुण जोडप्याने काळजीपूर्वक त्यांच्या विमा पॉलिसीची बास्केट निवडली पाहिजे. त्यासाठी ते आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकतात.

4) कर नियोजन :

भारतातील प्रत्येक तरुण कष्टकरी जोडप्याने करांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी प्रभावी कर नियोजन केले पाहिजे. ते गृह कर्ज घेऊ शकतात, विमा पॉलिसी किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा मालमत्ता भाड्याने देऊ शकतात. हा निर्णय जोडीदाराशी चर्चा करताना संयुक्तपणे घ्यावा.

5) गुंतवणुकीचे नियोजन :

विमा आणि गुंतवणुकीची काळजी घेण्याव्यतिरिक्त प्रत्येक तरुण जोडप्याने अन्य गुंतवणुकींवरही विचार केला पाहिजे जसे की म्युच्युअल फंड, मुदत ठेव किंवा दागदागिने इत्यादी. यामध्ये गुंतवणूक करताना सल्लागारासोबत काळजी पूर्वक योजना आखली पाहिजे.

6) आर्थिक सल्लागाराची नेमणूक :

बर्याच वेळा तरुण जोडपे गोंधळात पडतात आणि विविध आर्थिक निर्णयाबद्दल घाबरतात. या पॉलिसीमध्ये आपण गुंतवणूक करू नये किंवा गुंतवणूक करावी का? आपण गृह कर्ज घ्यावे का? एकदा अशा प्रकारची परिस्थितीची उद्भवल्यानंतर एखादा आर्थिक सल्लागार नेमावा, त्याकडून अशा प्रश्नांची उत्तरे दिली जाऊ शकतात.

7) सातत्याने पुनरावलोकन :

तरुण महत्वाकांक्षी जोडप्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत नसल्याने अनेकदा मोठी चूक करतात. त्यामुळे बऱ्याच काळासाठी आर्थिक समस्या निर्माण झाल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच, सल्ला दिला जातो की नवरा-बायको दोघांनीही त्यांचा आवक व संपत्ती, मालमत्ता व दायित्वे इत्यादींचा आढावा घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी वेळ काढावा.

8) जबाबदारी घेणे आणि जबाबदारी वाटणे :

असे दिवस गेले जेव्हा पुरुष कुटुंबाचा पोशिंदा समजले जात असे आणि पत्नीचे कर्तव्य फक्त घरगुती गोष्टींमध्ये मर्यादित होते. जगात आज पती-पत्नीच्या नात्यात महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. एक यशस्वी नातेसंबंध जबाबदारी घेणे आणि जबाबदारी वाटून घेणे यावर विश्वास ठेवते. वित्त नियोजन हे पती-पत्नीने एकत्रितपणे आणि जबाबदारीने केले पाहिजे. एकत्रितपणे एकमत होण्यामुळे भविष्यात दोष दूर होतील.

9) आपल्या मुलांसाठी एक उदाहरण निर्माण करा :

मुले त्यांच्या पालकांचे अनुसरण अगदी लहानपणापासून करतात. म्हणूनच, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विशेषत: आर्थिकदृष्ट्या पालकांनी आपल्या मुलांसमोर एक चांगले उदाहरण ठेवले पाहिजे. त्यांच्याद्वारे दर्शविल्या गेलेल्या काळजीपूर्वक आणि शहाण्या नियोजनाचा फायदा भविष्यात मुलांच्या आयुष्यासाठी योजना आखण्यात होतो.

10) पैशांच्या बाबतीत वारंवार चर्चा करा :

एका तरुण विवाहित जोडप्याला कौटुंबिक विस्तार, मुलांची वाढ आणि इतर घरगुती बाबी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यास आवडते. पैशाशी संबंधित चर्चा ही तिथे होतात, परंतु त्या संघटित पद्धतीने होत नाहीत. म्हणूनच, पती-पत्नीने काळजीपूर्वक बसून पैशाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा केली पाहिजे.
म्हणूनच, काळजीपूर्वक आणि प्रभावी आर्थिक नियोजनाद्वारे, एक तरुण जोडपे केवळ स्वत: साठीच नाही तर मुलांसाठी ही एक मजबूत आणि उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो.

(टीप : ब्लॉगमधील लेखकाची मते वैयक्तिक आहेत, गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या)