जगातील अनेक देशात लोकशाही नांदत आहे. तरीही काही देशात राजेशाहीचा थाट आहे. या रॉयल फॅमिलीचा रुबाब आजही कायम आहे. ज्यांच्या सत्तेचा सूर्य कधी मावळत नव्हता, अशा ब्रिटिश राजघराण्यापेक्षा पण हे राजघराणे सर्वात श्रीमंत आहे. त्यांनी ठरवले तर जगातील कित्येक देशांची गरिबी काही दिवसांतच गायब होऊ शकते.
सौदी अरब मध्ये 1932 पासून सऊद राजवंशाची सत्ता आहे. हे राजघराणं जगातील सर्वात शक्तीशाली कुटुंब आहे. त्यांच्या शाही खजिन्यात सोने-चांदी, बेशकिंमती हिरे आणि अन्य महागड्या वस्तू आहेत. त्यांच्याकडे आलिशान कारचा, जहाजांचा, विमानांचा, खासगी जेटचा ताफा आहे.
जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली कुटुंबापैकी हे एक राजघराणे आहे. त्यांच्याकडे अंदाजे 1.4 खरब अमेरिकी डॉलर एकूण संपत्ती आहे. ही संपत्ती ब्रिटिश रॉयल कुटुंबापेक्षा 16 पट जास्त आहे. या राजघराण्याचा राजा सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद हे आहेत. या शाही कुटुंबात जवळपास 15,000 लोक आहेत.
सध्या अलवलीद बिन तलाल अल सऊद हे या कुटुंबातील सर्वात श्रीमंत सदस्य आहेत. त्यांच्याकडे अंदाजे जवळपास 20 लाख अमेरिकन डॉलरची संपत्ती आहे.
सऊदी अरबचे राजा अल यामामा पॅलेसमध्ये राहतात. या राजघराण्याकडे जगभरात अनेक आलिशान बंगले आणि मोठी फार्म हाऊस आहेत. 1983 मध्ये रियाध याठिकाणी हा राजवाडा उभा आहे. तो 4 मिलियन चौरस फुटात विस्तारलेला आहे. यामध्ये चित्रपटगृह, अनेक स्विमिंग पूल आणि एक मस्जिद आहे.
सऊदी राजघराण्याकडे अनेक लक्झरी क्रूझ शिप आहे. प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे 400 दशलक्ष डॉलरचे सेरेन सुपरयाच आहे.
या शाही परिवाराकडे एक विशाल बोईंग 747-400 विमान पण आहे. हे जगातील सर्वात मोठे व्यावसायिक विमान आहे.