5 देश ज्यांच्याकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम, भारताची काय स्थिती ?
Iran-Israel War : इस्रायल आणि इराण यांच्या युद्ध सुरु झाल्याने जगभरात तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेतील देशातून आपआपल्या नागरिकांनी माघारी फिरावे असे आदेश प्रत्येक देशाने काढले आहेत. हेजबोलाचा प्रमुख हसन नसरुल्लाह याची हत्या केल्यानंतर इराणने शेकडो मिसाईल इस्रायलवर डागल्या आहेत. आता इस्रायल याला उत्तर म्हणून कोणते पाऊल उचलणार यावरुन जगात तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे.इस्रायलवर पडलेल्या अनेक मिसाईलना हवेत नष्ट करण्यात यश आले आहे. याला इस्रायलकडे असलेली एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. बदलत्या युद्धाच्या प्रकारात प्रत्येक देशाला एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम असावी असे वाटत आहेत. जगात कोण-कोणत्या देशांकडे ही अत्याधुनिक यंत्रणा आहे हे पाहूयात...