नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : मोदी सरकार देशभरातील रेल्वे स्टेशनाचा कायापालट (Smart Railway Station) करणार आहे. रेल्वे स्टेशनची केवळ रंगरंगोटी बदलण्यात येणार नाही तर त्यांना आधुनिकतेचा साज लावण्यात येणार आहे. स्मार्ट शहरांना शोभतील असे हे रेल्वे स्टेशन असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला हे मोठे गिफ्ट देणार आहे. 6 ऑगस्ट रोजी देशभरातील 508 रेलवे स्टेशनचा पूर्नविकास करण्यात येणार आहे. त्याची कोनशिला पंतप्रधान मोदी ठेवतील. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत भारतातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येणार आहे. विकासाचा स्पर्श झाल्यानंतर हे रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे होतील. त्यांचा चेहरामोहरा बदलून जाईल.
अमृत भारत स्टेशन योजना
अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत देशातील 508 रेल्वेस्टेशनचा कायापालट होईल. त्यांचा पूनर्विकास करण्यात येईल. याचा कोनशिला 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठेवतील. या योजनेत देशातील एकूण 1309 रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार आहे. पूनर्विकासानंतर हिमाचल प्रदेशातील अम्ब अन्दोरा रेल्वे स्टेशन असे दिसेल.
किती लागेल खर्च
सुरुवातीला 508 रेल्वे स्टेशनचा पूनर्विकास करण्यात येईल. या कामासाठी एकूण 24,470 कोटींहून अधिकचा खर्च येईल. या निधीतून हे स्टेशन स्मार्ट बनविण्यात येतील. सिटी सेंटरच्या धरतीवर हे रेल्वे स्टेशन विकसीत करण्यात येतील. त्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकारची योजना आहे की हे रेल्वे स्टेशन शहराच्या विकासाचे साधन व्हावेत. विकास झाल्यानंतर कोटा रेल्वे स्टेशन असे दिसेल.
कोणत्या राज्यातील किती रेल्वे स्टेशन
देशातील 508 रेल्वे स्टेशनचा पूनर्विकास करण्यात येईल. यामध्ये 27 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानचे 55 रेल्वे स्टेशन, बिहारचे 49, महाराष्ट्राचे 44,पश्चिम बंगालचे 37, मध्य प्रदेशचे 34, आसामचे 32, ओडिशाचे 25, पंजाबचे 22 स्टेशन, गुजरात आणि तेलंगाणाचे 21, झारखंडचे 20, आंध्र प्रदेश आणि तमिलनाडूचे 18-18, हरियाणाचे 15 आणि कर्नाटकच्या 13 रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे. गांधी नगर रेल्वे स्टेशन असे दिसेल.
अनेक सुविधा
रेल्वे स्टेशन आधुनिक करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीनेच आता रेल्वे स्टेशनवर रुफ प्लाझा होणार आहे. यामध्ये वेटिंग एरिया, स्थानिक उत्पादने, फुड कोर्ट, मुलांच्या खेळण्याचे ठिकाण, इतर वस्तूंची खरेदी करता येईल.
शहरांचा विकास होणार
या आधुनिक रेल्वे स्टेशन वर सर्वच सुविधा असतील. कोर्गो सेवा, हॉटेलिंग, पर्यटन स्थळांना जोडणारे हे दुवा असतील. तसेच त्या त्या शहरातील खास पदार्थ, वस्तू यांना जागतिक पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे शहरांचा विकास होईल.