मेळघाटातील मोथा येथील शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरी पिकाची शेती, त्यामुळे तिथं चर्चेचा विषय बनला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील शेतकऱ्याने १ एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरी पिकांची लागवड केली,
साधुराम पाटील या शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पिकांच्या बरोबर स्ट्रॉबेरीची शेती केल्यामुळे त्यांना एका एकर शेतामध्ये तीन लाख रुपयाचे असे उत्पन्न झाले.
त्यामुळे चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांकडून स्ट्रॉबेरीची मोठी मागणी आहे
एकेकाळी महाबळेश्वरची प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी आता अमरावतीच्या चिखलदऱ्यात सुध्दा पाहायला मिळत आहे.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या देशभरातील पर्यटकांना ती भावते, त्यामुळे जिथे पिकते , तिथेच ती खपते सुध्दा