अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीच्या कार्यालयात आज दुपारच्या सुमारास भलामोठा कोब्रा साप घुसला. या सापाला पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली.
अंबरनाथ एमआयडीसीत एका कंपनीच्या कार्यालयात आज दुपारच्या सुमारास कर्मचाऱ्यांना अचानक एक कोब्रा जातीचा साप बसलेला आढळला.
यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती अंबरनाथ शहरातील सर्पमित्र प्रकाश गोहिल आणि आकाश गोहिल यांना दिली. या दोघांनीही कंपनीत धाव घेत साप बघितला असता तो विषारी कोब्रा जातीचा साप असल्याचं आढळून आलं.
त्यातच सध्या दुपारच्या वेळी असलेल्या प्रचंड गर्मीमुळे हा साप काहीसा चिडलेला होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सर्पमित्रांना मोठी कसरत करावी लागली. मात्र अखेर तब्बल पाच फूट लांबीच्या या कोब्राला सुरक्षितपणे पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात सर्व मित्रांना यश आलं.