Marathi News Photo gallery Shelter for a bull pair in a replica of Raigad, a different initiative of a Thane farmer
Photo Gallery : आंबेगावच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीमध्ये विसावा घेत आहे बैलजोडी
ठाणे : बैलजोडी अन् शेतकऱ्याचं नातं हे नव्याने सांगायची गरज नाही. शेतकरी अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे या मुक्या प्राण्याचा सांभाळ करीत असतो. यातच हौशी शेतकरी काय करु शकतात याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठमध्ये समोर आले आहे. सध्याच्या उन्हाच्या झळा वाढत असून माळरानात तर याची दाहकता जर जास्तच जाणवत आहे. या रखरखत्या उन्हापासून पशूधनाचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने त्यांच्यावर मायेची सावली धरली आहे.बैलांसाठी रायगड किल्याची मेघडंबरी बनवली असून, त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.