पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये मदर्स वॅक्स म्युझियम बनवण्यात आला आहे. या म्युझियममध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. या म्युझियममध्ये महान फुटबॉलर मॅरोडोनापासून ते कविवर्य, गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे मेणाचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.
या प्रत्येक पुतळ्याच्या माध्यमातून काही तरी संदेश देण्याचा प्रयत्न कारागिरांकडून करण्यात आला आहे. प्रसिद्ध फुटबॉलर मॅरोडोनाच्या पुतळ्यासोबत एक महिला सेल्फी घेताना दिसत आहे.
या म्युझियममधील विराट कोहली, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरचे पुतळे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
या म्युझियममध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांचाही पुतळा असून अतिशय सुंदर असा हा पुतळा आहे.
बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा पुतळासुद्धा येथे आहे.
जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळाही येथे ठेवण्यात आला आहे.