नागपूर नाईक तलावात भला मोठा कासव सापडला, १२० किलो वजन असल्यामुळे…
महेश घोलप |
Updated on: Apr 17, 2023 | 10:44 AM
नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या नाईक तलावाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या तलावात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे कासव असल्याचे नागरिकांनी सांगितले होते.
1 / 5
नागपूरातील नाईक तलावात भला मोठा कासव आढळून आला आहे. तब्बल १२० किलो वजनाचा कासव पहाण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.
2 / 5
नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या नाईक तलावाच्या सौंदर्यकरणाचे काम सुरू आहे. या तलावात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे कासव असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. महिनाभरापासून त्या कासवाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू होते.
3 / 5
पण तलावात पाणी आणि गाळ त्यामुळे ते शक्य होत नव्हतं, आता उन्हाळ्यामुळे तलावातलं पाणी आटल्याने कासवाला स्पष्ट पाहता येत होता. मात्र गाळ असल्याने त्या कासवाला पकडण्यात अनेक अडचणी येत होत्या.
4 / 5
काल स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवित कासवाला यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आलं. सॉफ्ट शेल असलेला हा कासव जवळजवळ १२० किलो वजनाचा असण्याची शक्यता आहे.
5 / 5
कासवाला रेस्क्यू करून सेमिनरी हिल्स येथील ट्रांजिट सेंटरमध्ये ठेवण्यात आल असून तलावाचा नूतनीकरण झाल्यानंतर पुन्हा त्याला त्याच तलावात सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या तलावात इतका मोठा कासव कसा आला हे देखील एक संशोधनाचाच विषय आहे.