Aadhaar Card & Voter Card Photos : आधार कार्ड असो की व्होटर आयडी.. फोटो नेहमी खराबच का येतात ?
Aadhaar Card & Voter Card Photos : साधारणपणे मतदार ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी आणि आधार कार्ड यांच्यावरचे फोटो पाहिले, तर प्रत्येकाचे फोटो हे बरेच खराब असतात. पण असं का होतं हे तुम्हाला माहीत आहे का ?
1 / 7
देशात राहण्यासाठी लोकांकडे किंवा नागरिकांकडे अनेक कागदपत्रे असणे आवश्यक असते. रोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी ही कागदपत्र लागतातचं. यापैकी काहीडॉक्युमेंट्स अशी आहेत जी जवळपास सर्वच लोकांकडे असतात.
2 / 7
अशी काही कागदपत्रं म्हणजे आधार कार्ड, व्होटर आयडी, पॅन कार्डही, ही डॉक्युमेंट्स देशात बहुतांश लोकांकडे असतातच. भारतामध्ये ओळखपत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. पण या सर्व कागदपत्रांमध्ये एक गोष्ट साम्य आहे.
3 / 7
ते म्हणजे या डॉक्युमेंट्सवर लोकांचे जे फोटो असतात ते खूपच खराब क्वॉलिटीचे असतात. एखादा माणूस आणि त्याचा या डॉक्युमेंट्सवरील फोटो यांची तुलना करून पाहिली तर तो एकाच व्यक्तीचा आहे असं वाटणारच नाही, असा तो फोटो येतो.
4 / 7
आधार कार्ड असो किंवा व्होटर आयडी, या दोन्ही डॉक्युमेंट्सवर एवढे खराब फोटो येतात, त्याचं कारणं तरी काय ?
5 / 7
खरं सांगायचं तर हे ओळखणं काही एवढं कठीण नाहीये, किंवा त्यामागे काही रॉकेट सायन्सही नाही. हे फोटो एवढे खराब येतात, त्याचं कारण अतिशय सोपं आणि सामान्यच आहे.
6 / 7
एखादा माणूस कुठे फोटो काढत असेल किंवा स्टुडिओतही फोटो काढायला गेला, तर त्यापूर्वी लायटिंग ठीक आहे ना हे नक्की चेक केलं जातं, तेव्हाच तो फोटो चांगला येतो. पण या डॉक्युमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर जिथे त्यासाठी फोटो काढला जातो, त्या कार्यालयात किंवा ऑफीसमध्ये पुरेसा प्रकाश नसतो. असाच फोटो काढला जातो.
7 / 7
हे फोटो खराब येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो फोटो डिजिटल पद्धतीने अपलोड केल्यावर, कार्डवर प्रिंट करताना त्याची क्वॉलिटी अतिशय खराब येते. याच काही कारणांमुळे बहुतांश लोकांचे आधार कार्ड किंवा व्होटर आयडीवरी फोटो हे खराब येतात.