ताजिकिस्तानी सिंगर अब्दू रोजिक मुंबई एअरपोर्टवर दिसला. सध्या तो भारतात आहे.तो शनिवारी मुंबई एअरपोर्टवर दिसला. त्याला कॅमेऱ्यात कैद करायची एक ही संधी फोटोग्राफर्सनी सोडली नाही.
जगातील सर्वात लहान गायक अब्दु रोजिक मुंबई विमानतळावर दिसला. त्याला पाहताच त्याच्या चाहत्यांचा गराडा त्याच्या भोवती झाला. अब्दू रोजिकने आनंदाने चाहत्यांसोबत छायाचित्रांसाठी पोझ दिली.
अब्दु रोजिक हा ताजिकिस्तानी गायक आहे. त्याने जगातील सर्वात लहान गायकाचा किताब पटकावला आहे. तो 18 वर्षांचा आहे.
अब्दू रोजिक बॉक्सिंग पोज देताना दिसला? गोंडस आहे ना ?
अब्दू रोजिकने अलीकडेच अबू धाबी येथे आयफा 2022 मध्ये सलमान खानची भेट घेतली. त्याने सलमानसमोर “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” हे गाणेही गायले.Source: ANI Photos