सर्वसामान्यांना झटका, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनसारखी घरगुती उपकरणं पुन्हा महागणार
कमोडिटी मार्केटच्या अहवालानुसार, घरगुती उपकरणांच्या (Home Appliances) किंमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.
(AC TV washing machine refrigerator prices increase)
1 / 5
कोरोना आणि लॉकडाऊन काळात निर्बंधामुळे घरगुती उपकरणांची (Home Appliances) दुकाने बंद आहेत. हे सामान अत्यावश्यक सेवांमध्ये येत नाही. तर दुसरीकडे घरगुती उपकरणांच्या किंमतीत वाढ (Commodity Prices Hike) होत आहे.
2 / 5
घरगुती उपकरणांच्या किंमती जुलै 2021 पासून 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोतीलाल ओसवाल फायनाशियल सर्व्हिसेसने दिलेल्या अहवालानुसार, घरगुती उपकरण बनवणाऱ्या काही कंपन्यांनी धातूच्या किंमतीत वाढ केली आहे. तर काही घटक मिळत नसल्याने या उपकरणांच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात वाढवण्यात आल्या आहेत. त्यावेळी लॉकडाऊन शिथील झाल्याने अनेकजण वस्तू खरेदी करत होते. मात्र आता लॉकडाऊनमुळे पुन्हा या उपकरणांच्या विक्रीत घट झाली आहे.
3 / 5
फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जागतिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे CRB Index म्हणजेच कोअर कमोडिटी सीआरबी इंडेक्स एप्रिल 2021 मध्ये 70 टक्क्यांनी वाढला आहे. याचा थेट परिणाम उद्योगांसह ग्राहकांवर पडला आहे.
4 / 5
फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा ब्रॅण्डेड कंपन्यांचे एसी
5 / 5
सीकेएस स्मार्ट इक्विटीचे ग्राहक वस्तू विश्लेषक वरुण खोसला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ग्राहकांच्या वस्तूंची मागणी खूपच कमी आहे. तर दुसरीकडे कच्च्या मालाची किंमत वाढत आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढवण्यासाठि कंपनी पुढचा एक महिना थांबू शकते. पण काही महिन्यांनी वाढलेल्या किंमतीचा आर्थिक भार हा ग्राहकांवरच येणार आहे.