Photo Buldana | अकोल्यात गोवंश प्रकरणातील कारवाई; संग्रामपूर कडकडीत बंद! विहिंप, बजरंग दल आक्रमक
अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड पोलिसांनी समाजकंटकावर थातूरमातूर कारवाई केली. पण गोरक्षकांवर गुन्हे दाखल केले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन पुकारले. याला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
1 / 5
अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड पोलिसांनी समाजकंटकावर थातूरमातूर कारवाई केली. पण गोरक्षकांवर गुन्हे दाखल केले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन पुकारले.
2 / 5
या आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने ही केलीत.
3 / 5
दानापूर शेत शिवारात 10 एप्रिल रोजी रात्री 2 ते 3 च्या सुमारास 40 गोवंश संशयास्पद स्थितीत जाताना दिसले. याबाबतची माहिती शेतकरी व गोरक्षकांनी पोलिसांना दिली.
4 / 5
पोलीस गोवंश ताब्यात घेऊन हिवरखेडला जात होते. काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला करून गोवंश पसार केले. याप्रकरणी पोलिसांनी काही समाजकंटकांवर कारवाई केली. मात्र, गोरक्षकांवरही गुन्हे दाखल केले आहेत.
5 / 5
हा अन्याय असल्याचा आरोप करत संग्रामपूर शहर आणि तालुका बंद करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.