Sabha Azad : अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझाद लग्नबेडीत अडकणार?
हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिकृतपणे दोघांनीही यावर काहीही बोललेले नाही. विशेष म्हणजे, काही काळापासून हृतिक रोशनचे नावगायिका- अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे.
1 / 7
अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघेही सोशल मीडियावर आपले एकत्रित व्हडिओ शेअर करताना दिसतात. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत? अशी चर्चा सुरु आहे.
2 / 7
काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन व सबा आझाद दोघेही पॅरिसच्या ट्रीपवर गेले होते. त्यावेळी तेथील दोघांचे रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केलं होते.
3 / 7
काही काळापूर्वी सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनीही भविष्यात हृतिक रोशन दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली होती. जेव्हा हृतिकने त्याची पहिली पत्नी सुजैन खानला घटस्फोट दिला तेव्हा हा अंदाज वर्तवण्यात आला होता.
4 / 7
करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत या जोडप्याने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर अधिकृतपणे एकत्र पोझ दिली. नुकतेच ते दोघेही परदेशात गेले होते, ज्यांचे फोटो सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते.
5 / 7
हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे, मात्र अधिकृतपणे दोघांनीही यावर काहीही बोललेले नाही. विशेष म्हणजे, काही काळापासून हृतिक रोशनचे नाव गायिका- अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे.
6 / 7
हृतिक आणि सबा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, तर सोशल मीडियावर दोघेही एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करत राहतात. यासोबतच हृतिकच्या कुटुंबातील अनेकांनीही सबावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
7 / 7
अनेकवेळा हृतिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सबाशी संबंधित काहीतरी शेअर केले आहे, तर दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत राहतात. याशिवाय दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.