Ritesh Deshmukh : अयोध्येत पोहोचला रितेश देशमुख पोहोचला, सहकुटुंब घेतलं रामलल्लाचं दर्शन
रितेश आणि जेनेलिया देशमुख हे मनोरंजनसृष्टीतील एक पॉवर कपल, आदर्श जोडपं म्हणून त्यांची ओळख. ते त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. रितेश नुकताच सहकुटुंब अयोध्येत पोहोचला, त्याचे खास फोटोही त्याने चाहत्यांसोबत शेअर केले.
1 / 6
रितेश आणि जेनेलिया देशमुख हे मनोरंजनसृष्टीतील एक पॉवर कपल, आदर्श जोडपं म्हणून त्यांची ओळख.
2 / 6
रितेश, जेनेलियाने नुकतेच अयोध्येत जाऊन सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
3 / 6
मंत्रो से बढके तेरा नाम…जय श्री राम! आज रामलल्लाचं दर्शन घेता आलं, आम्ही धन्य झालो #राममंदिरअयोध्या - अशी कॅप्शन रितेशेन या फोटोसोबत लिहीली. त्याच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव केला.
4 / 6
रितेश देशमुख सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो. चाहत्यांना तो नेहमी त्याचे अपडेट्स देत असतो.
5 / 6
रितेश-जेनेलिया, त्यांच्या मुलांसोबत, कुटुंबियांसोबतचे फोटोही शेअर करत असतात.
6 / 6
त्यांच्या फोटोंना चाहत्यांकडूनही तितकीच पसंती मिळते, अनेक कमेंट्स करत चाहते त्यांचं कौतुकही करतात.