Marathi News Photo gallery Actor shah rukh khans son studies in Mumbais most expensive school know what is the fee of school and other facilities
शाहरूखचा लेक शिकतो सर्वात महागड्या शाळेत, अबरामची फी किती ?
Shahrukh Khans son Abram Khan school Fees : शाहरुख खानचा मुलगा अबराम हा खूप क्यूट आहे. त्याच फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. पण अबराम कोणत्या शाळेत शिकतो ? ती मुंबईतील सर्वात महागडी शाळा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ?
1 / 8
अभिनेता शाहरुख खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंबच नेहमी चर्चेत असतं. त्याचा सर्वात धाकटा मुलगा अबराम खान खूप गोंडस आहे. अबरामचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. पण तो कोणत्या शाळेत शिकतो आणि त्या शाळेची फी किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? ( फोटो : इन्स्टाग्राम)
2 / 8
अबराम खान मुंबईतील सर्वात महागड्या शाळेत शिकतो. या शाळेत मुलांना शिकवणे हे सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. कारण त्याची फी खूप जास्त आहे.
3 / 8
मुंबईत अनेक नामवंत शाळा आहेत पण धीरूभाई अंबानी शाळा अव्वल आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात 2003 मध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केली होती.
4 / 8
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही बॉलिवूड स्टार्सची आवडती शाळा आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार किड्सनी येथून शिक्षण घेतले आहे.
5 / 8
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा अबराम खानही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. वांद्रे पूर्व येथील बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये ही शाळा आहे. या शाळेत एलकेजी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि मोठा मुलगा आर्यन खान यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले.
6 / 8
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किंडरगार्टनसाठी 14 लाख रुपये ते 12 वीच्या वर्गासाठी 20 लाख रुपयापर्यंत आहे. या शुल्कामध्ये पुस्तके, स्टेशनरी, गणवेश आणि वाहतूक यासारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश आहे.
7 / 8
एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंत वार्षिक फी 1,70,000 रुपये आहे, 8वी ते 10वी पर्यंतची फी 5,90,000 रुपये आहे. इयत्ता 11वी आणि 12वीची फी 9,65,000 रुपये आहे. या शाळेत मुलांना अनेक सुविधा मिळतात. 1 लाख 30 हजार स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेल्या या शाळेत खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, एसी क्लासरूम, रूफटॉप गार्डन आणि टेनिस कोर्ट देखील आहे.
8 / 8
अभिनेत्री सारा अली खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, अनन्या पांडे, न्यासा देवगन या स्टारकि्डसनी देखीलही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.