अभिनेत्री आमना शरीफ तिच्या हटके लूकमुळे खूप चर्चेत असते. ती सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
सध्या आमनाने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
आमनाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना आकर्षित करत असतो.
आमनाने या फोटोमध्ये क्रॉप टॉप आणि रेड डेनिम जीन्स घातली आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे.
या फोटोत तिने काळ्या रंगाचा गॉगल आणि कानात रिंग घातली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.