मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकारांना लग्नाचे वेध लागले आहेत. या यादीत आता आणखी एक नाव सामील झाले आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावेनेदेखील या शुभ मुहूर्तावर आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
अभिज्ञाने मेहुल पैसोबत साखरपुडा करत, चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
अभिज्ञाने जीवनसाथी म्हणून निवडलेला मेहुल पै हा मूळचा मुंबईचा असून, ‘क्लॉकवर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
हिंदी मालिका ‘प्यार की एक कहानी’द्वारे मालिका विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिज्ञाने ‘हवाईसुंदरी’ म्हणून देखील काम केले आहे.
गेल्यावर्षी अभिज्ञाने मेहुलसोबतच्या नात्याची कबुली दिली होती.