मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै हा कॅन्सरबरोबर मोठ्या धाडसाने लढा देत आहे. काही दिवसांपूर्वी मेहुलने याबाबतची पोस्ट शेअर करता याबाबतची माहिती दिली होती. पोस्ट सोबत त्याने रूग्णालयातील फोटोही शेअर केले होते. फोटो पाहून अनेकजण हळवे झाले होते.
या फोटोला मेहुलने अतिशय भावुक करणारं कॅप्शन दिलं तो म्हणाला ' मला माझ्या आयुष्यात अनेक मूर्ख लोक भेटलेत. पण कॅन्सर हा त्यापैकी सर्वात मोठा मूर्ख... माफ कर कॅन्सर, पण तू चुकीच्या व्यक्तिला निवडलं आहेस...,’
मेहूलच्या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थनांही केली. अनेकांनी त्याच्या त्याचे मनोबल वाढणवणाऱ्या कमेंट पोस्ट केलेल्याही दिसून आल्या.
6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा व मेहुल दोघंही लग्नबंधनात अडकले होते.
कतंच मेहुल आणि अभिज्ञान दॅट होव वी ट्रीट अवर थेरपी डेज असे कॅप्शन देता एक व्हिडीओ शेअर केला आहे.