अभिनेत्री अमृता खानविलकरनं विंटर स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.हे फोटोशूट आता चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.
अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा नेहमीच चर्चा होते. या वेळीसुद्धा तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
अमृता या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.