अभिनेत्री आर्या वोरा लोकप्रिय ब्लॉगर आहे. ती नेहमी उत्तम फॅशन आणि लाईफस्टाईल यावर अनेक गोष्टी शेअर करत असते.
अभिनेत्री आर्या वोराने लॉकडाऊननंतर गोव्यात बंजी जम्पिंगचा थरार अनुभवला आहे .
'देवों के देव महादेव' टेलीव्हिजन मालिका, 'माय फ्रेंड गणेशा' आणि 'क्लिक' सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊनमध्येच स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे .
व्हिडीओ ब्लॉगद्वारे तिने लॉकडाऊननंतर सावधानता बाळगत उदयपूर, अमृतसर, हिमाचलप्रदेश आणि गोव्यात सोलो प्रवास केला.
गोव्यात समुद्रकिनारे, चर्च, क्रूज याशिवाय बंजी जम्पिंगचा थरारही अनुभवता येतो, याची फार कमी लोकांना माहिती आहे.