अभिनेत्री भाग्यश्री मोटे कायम तिच्या बोल्ड अंदासाठी चित्रपटीत सृष्टीत प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या भाग्यश्रीने नुकतेच आपले बोल्ड फोटोसोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या वाढत्या वजनाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आपल्या चाहत्यानाही दिली होती. तसेच कुठल्याही गोष्टीबद्दल माहिती नसताना केवळ वाट्टेल ती प्रतिक्रिया देऊ नका असे म्हणत फटकारले होते.
मराठी आणि हिंदीसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतही तिने काम केलं आहे. भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तिने चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतप्रवेश केला आहे.
यापूर्वीही भाग्यश्रीने तिच्या कमरेवरती महामृत्युंजय मंत्राच्या ओळींचा टॅटू गोंदवल्या आहेत. भाग्यश्रीनं त्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होता.
Tropical असे कॅप्शन देत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.