टीव्ही अभिनेत्री चारू आसोपा (Charu Asopa) लवकरच आई होणार आहे. आज (26 मे) गर्भवती चारूचे पहिले चंद्रग्रहण आहे. म्हणूनच, तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवर यावेळी गर्भवती महिलांनी कोणती खबरदारी घ्यावी, याच्या टिप्स दिल्या आहेत. चारु असोपा यांनी सांगितले की, चंद्रग्रहणात स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याविषयी त्यांच्या घरच्या सदस्यांनी त्यांना बऱ्याच सूचना पाठवल्या आहेत.
ग्रहणानंतर 5 तास घर सोडू नये, असा सल्ला चारूने सर्व गर्भवती महिलांना दिला. ज्या ठिकाणी ग्रहणाची किरणे आत येत नाहीत अशा ठिकाणी रहा आणि घराचे दरवाजे बंद ठेवा, असे देखील सांगितले आहे.
चारू म्हणाले की, गर्भवती महिलांनी कोणतीही धारदार वस्तू पकडू नये आणि ग्रहण काळात काहीही खाऊ नये, जे काही हवे आहे ते आधीच खा. चारू म्हणाले की ग्रहणाच्या काळात गर्भावतीने गीता ऐकावी.
चंद्र ग्रहणाची आपली योजना सांगताना चारू म्हणाली की, त्यांच्या कुटुंबाचा असा विचार आहे की ते एकत्र बसून उपासना करतील आणि सगळेच गीता ऐकतील. चारूने सर्व गर्भवती महिलांना स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
चारू असोपा तिच्या प्रेग्नन्सीसंबंधित गोष्टी तिच्या यूट्यूब चॅनेलवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. चारूने अलीकडेच सांगितले होते की, गर्भधारणेदरम्यान महिलांनी काय-काय खावे...
चारू असोपाने सोशल मीडियावर बेबी बंप शेअर करत या आनंदाच्या बातमीची घोषणा केली. चारू आणि तिचा नवरा राजीव सेन घरात नवीन पाहुण्याच्या चाहुलीने खूप उत्साही झाले आहेत. चारूची डिलिव्हरी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
चारू असोपा ही सुष्मिता सेनच्या भावाची पत्नी आहे. या बाळासाठी सुष्मिताही खूप उत्सुक आहे. इन्स्टाग्रामवर आनंद व्यक्त करत या अभिनेत्रीने लिहिले की, मी ही बातमी शेअर करण्याची वाट पाहत होते. मी आत्या होणार आहे. माझा भाऊ राजीव आणि वहिनी चारू यांचे अभिनंदन.’
लहान मुलाच्या आगमनाची वाट पाहत होतो. चारू एक चांगली आई होईल. सेन आणि आसोपा परिवाराचे खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा देखील सुष्मिताने दिल्या आहेत.