Chhabi Mittal : कर्करोगाच्या थेरपीच्या जखमा दाखवत अभिनेत्री छवी मित्तलने सांगितला त्रासदायक अनुभव
कर्करोगाच्या प्रवासाचा काळ खूप वेदनादायी होता. मला हे ब्रेस्ट कॅन्सर जर्सी मार्क दाखवायला लाज वाटत नाही. माणसाला व्यक्तीच्या शरीरावर खुणा दिसतात, मनावर झालेल्या नाही.
1 / 9
टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल नुकतीच कॅन्सरवर मात केली आहे . छावीलास्तनाच्या कर्क रोगाचे निदान झाले होते त्यानंतर तिने कर्करोराच्या संबधीची शस्त्रक्रिया केली आहे.
2 / 9
कर्करोगावरील शस्त्रक्रियेनंतर छवी मित्तल तिच्या शस्त्रक्रियेच्या जखमा दाखवल्या आहेत. या जखमांसह आपले फोटो छावीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये या जखमा स्पष्टपणे दिसत आहेत.
3 / 9
कर्करोगाच्या अनुभवाला सामोरे जाताना होणाऱ्या त्रासाची माहिती छावीने एका मुलाखतीत बोलताना दिली आहे .ती म्हणाली की रेडिएशन थेरपी संपणार असली तरी त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत.
4 / 9
मला स्तनामध्ये खूप वेदना जाणवत आहेत. थेरपीसाठीचे जसे जसे दिवस जातात, तसतसे ही वेदना वाढत जाते. मला खूप लवकर थकवा जाणवू लागतो. मला कधीकधी मला ते सहन होत नाही.
5 / 9
सकाळी मी फ्रेश असते कारण रात्री भरपूर आराम करते. मात्र जसा जसा दिवस मावळायला लागतो. तसतसा मला थकवा जाणवायला लागतो. वेदना कमी करण्यासाठी मी पॅरासिटामॉलची गोळी घेतो, पण तरीही काहीही परिणाम होत नाही.
6 / 9
कर्करोगाच्या प्रवासाचा काळ खूप वेदनादायी होता. मला हे ब्रेस्ट कॅन्सर जर्सी मार्क दाखवायला लाज वाटत नाही. माणसाला व्यक्तीच्या शरीरावर खुणा दिसतात, आत्म्यावर नाही.असे तिने आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
7 / 9
एप्रिल 2022 मध्ये छवी मित्तलने सांगितले होते की तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
8 / 9
छवी म्हणाली "मी आयुष्यभर साखर खाऊ शकत नाही. मी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकत नाही. मला खूप कमी चीज खाण्याची परवानगी आहे. मी लाल मांस खात नाही.
9 / 9
अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीने देखील स्तनाच्या कर्करोगाशी झालेल्या लढाईचा खुलासा केला आहे. यानंतर तिच्या बाल्ड लूकबद्दलही बोलली आहे.