Deepshikha Nagpal: अभिनेत्री दीपशिखा नागपाल म्हणतेय ‘पती’ हा परमेश्वर म्हणण्या लायक असावा …
ट्रोल करण्यापूर्वी लोक का विचार करत नाहीत की जेव्हा दोन व्यक्ती असे प्रेम करतात तेव्हा त्यांची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. त्यांचा एकमेकांशी आत्मीयतेचा संबंध असतो.
1 / 7
स्टार भारत वाहिनीवर नवीन शो सुरु झाला आहे, 'ना उम्र कि सीमा हो'. असे शोचे नाव आहे. या शोमध्ये मुलीच्या वयापेक्षा दुप्पट किंवा वयाने मोठा असलेल्या जोडीदार जोडप्यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहेत.
2 / 7
या शो मध्ये अभिनेत्री दीपशिखा नागपाल सहभागी झाली आहे. जेव्हा तिला याबाबतच मत विचारले तेव्हा ती म्हणाली 'जेव्हा एखादी मुलगी मोठ्या मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा लोक म्हणतात, अहो तो तिच्या वडिलांच्या वयाचा आहे, जेव्हा एखादी मोठी मुलगी लहान मुलावर प्रेम करते तेव्हाही तिला खूप ट्रोल केले जाते.
3 / 7
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनाही याच कारणावरून खूप ट्रोल करण्यात आले आहे. पण दोघांचाही एकमेकांवर इतका विश्वास आहे, की लोक काय म्हणतात याला काही फरक पडत नाही.असेही ती म्हणाली
4 / 7
आमचे वयातही लग्न करून लोकांनी कोणते झेंडे लावले आहेत? काही महिन्यांत घटस्फोट होत आहेत. याची अनेक कारणे असू शकतात, पण माझा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात, तेव्हा त्यांना ते करू द्या, त्यांचे स्वतःचे आयुष्य आहे, त्यांना जगू द्या, त्यांचे आयुष्य हराम करू नका.
5 / 7
पती परमेश्वर असतो असे आपल्याला शिकवले ज़ाते. मात्र परमेश्वर म्हणन्या लायक पती असला पाहिजे. माझे दोनदा लग्न झाले पण दोन्ही लग्न टिकली नाहित.
6 / 7
जेव्हा मी जीत उपेंद्रशी पहिले लग्न केले तेव्हा लोक म्हणू लागले की तो माझ्यापेक्षा मोठा आहे. लोक ट्रोल करू लागले. मला असे वाटायचे की मला वाटायचे किमी वेळेनुसार चालत आहोत, ते पण आमच्या नात्यात प्रगती झाली नाही. त्यानंतर केलेले दुसरे लग्नही टिकले नाही.
7 / 7
कोविडमध्ये कळाले कि कोण कधी निघून जाईल हे कोणाला माहीत होतं? किती लोक गेले, आयुष्याचा भरवसा काय, आज आहे उद्या नाही . नातं असं असलं पाहिजे की ते आयुष्यभर टिकेल आणि अशी नाती रोजची बनत नाहीत.