गेले अनेक दिवस अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. मानसीनं तिच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली दिली होती, त्यानंतर दोघांनी साखरपुडासुद्धा केला. आता मानसीच्या लग्नाचं काउंटडाऊन सुरू झालं आहे.
मानसी उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. दोघंही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
आता मानसी लग्न करतेय म्हटल्यावर बॅचलर पार्टी तर होणारच ना. त्यामुळे मानसीच्या खास मैत्रिणींनी तिच्यासाठी बॅचलर पार्टीचं आयोजन केलंय.
या बॅचलर पार्टीचे काही फोटो मानसीनं सोशल मीडियावर शेअर केले आहे.
'I Can’t Marry My Mister Without My Sister ??????Close friends are Truly Life’s Treasure.'असं कॅप्शन देत मानसीनं हे फोटो शेअर केले आहेत.
या हाऊस पार्टीमध्ये मानसीनं स्पेशल आणि ट्रेंडी केकसुद्धा कापला.